- किशोर मराठे
अलीकडे मशरुम शेती नावारूपास येऊ लागली आहे. यामध्ये ऑयस्टर आणि बटन मशरूम अधिक प्रचलित असल्याचे दिसून येते. मात्र या व्यतिरिक्त मशरूम अनेक रंगांमध्ये येतात, जसे की गुलाबी, निळे, पिवळ्या केशरी रंगामध्ये. या सगळ्या रंगाचे मशरूमची शेतीनंदुरबार जिल्ह्यात होऊ लागली आहे.
यामध्ये पांढरे बटण मशरूम, गुलाबी ऑयस्टर मशरूम, चमचमणारे निळे मशरूम, आणि अगदी पिवळ्या-केशरी रंगाचे चँटेरेल मशरूम. वन औषधी वनस्पती म्हणून ओळख असलेल्या सातपुड्याच्या वनराईत अशा पद्धतीने वेगवगेळ्या रंगाचे मशरूम निर्मितीवर संशोधन करून ते प्रत्यक्षात प्रायोगिक तत्त्वावर भर दिला जात आहे.
साजर काजू (Sajor Caju) मशरूमरंग : फिकट तपकिरी (काजूसारखा)तापमान : 20 अंश ते 30 अंश सेल्सिअस आर्द्रता : 80–90 टक्के वैशिष्ट्ये : भारतात सर्वात जास्त उत्पादन घेतले जाणारे मशरूम. फळाचा आकार मोठा व मांसल असतो. कमी खर्चात उत्पादन घेता येते. उपयुक्तता: प्रथिन व फायबर्समध्ये भरपूर. अन्नपचन व रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. टिकवणूक चांगली.
फ्लोरिडा (Florida) – व्हाईट / क्रीमी मशरूमरंग : पांढरट-क्रीम रंगाचातापमान : 20 अंश ते 30 अंश सेल्सिअसआर्द्रता : 80–90 टक्के वैशिष्ट्ये सौम्य चव असलेले सौंदर्याने आकर्षक व बाजारात मागणी जास्त कमी तापमानात चांगले उत्पादन
पिंक मशरूम (Pleurotus Djamor)रंग : गुलाबी तापमान : 21 अंश ते 35 अंश सेल्सिअसआर्द्रता: 65–90 टक्के वैशिष्ट्ये : वेगाने उगवणारा हा प्रकार असून मात्र कमी काळ टिकतो. ताजेपणातच विक्री करावी. चव थोडीशी मांसाहारीसारखी, म्हणून काहींना आवडते.उपयुक्तता : हृदयासाठी लाभदायक अँटीऑक्सिडंट व अँटीबॅक्टेरियल गुण
गोल्डन मशरूम (Pleurotus Citrinopileatus)*रंग : पिवळसर (सोनसळी) तापमान : 21 अंश ते 30 अंश सेल्सिअसआर्द्रता : 65–80 टक्के वैशिष्ट्ये : सौंदर्यदृष्ट्या खूप आकर्षक उत्पादन प्रमाण थोडं कमी.उष्ण हवामानात उत्तम वाढतेउपयुक्तता : यकृतासाठी लाभदायक अँटी-कॅन्सर गुणधर्म
ब्लू मशरूम (Pleurotus Ostreatus)रंग : निळसर/हिरवट निळा तापमान : 20°–40°C आर्द्रता : 60–90 टक्के वैशिष्ट्ये : उष्ण व कोरड्या हवामानातही उत्पादन बाजारात वेगळेपणामुळे मागणी फळधारणा लवकर होत.उपयुक्तता : मधुमेह व कोलेस्टेरॉल नियंत्रण हृदय व मज्जासंस्थेसाठी उपयुक्त
प्रत्येक मशरूम प्रकाराच्या वाढीसाठी योग्य तापमान व आर्द्रता राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य प्रशिक्षण आणि देखरेख केल्यास अल्पभांडवलात उत्तम नफा मिळवता येतो. वैज्ञानिक संशोधनानुसार ही माहिती मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी सादर केली आहे.
Web Summary : Nandurbar district cultivates various colorful mushrooms like pink, blue, and yellow. Sajor Caju boosts immunity. Pink mushrooms aid the heart. Blue mushrooms help control diabetes. Proper conditions are key for profit.
Web Summary : नंदुरबार जिले में गुलाबी, नीले और पीले जैसे विभिन्न रंगीन मशरूम उगाए जाते हैं। साजोर काजू रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाता है। गुलाबी मशरूम हृदय के लिए सहायक होते हैं। नीले मशरूम मधुमेह को नियंत्रित करने में मदद करते हैं। मुनाफे के लिए उचित परिस्थितियाँ महत्वपूर्ण हैं।