Solar Pump : दिवसा सिंचनाची दीर्घकाळची शेतकऱ्यांची स्वप्ने आता प्रत्यक्षात उतरत आहेत. राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेमुळे लातूर परिमंडळातील तब्बल २१ हजार ४१६ शेतकरी स्वतःच्या शेतात विजेच्या चिंतेशिवाय सिंचन करत आत्मनिर्भर झाले आहेत. (Solar Pump)
पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करून शेती अधिक शाश्वत करण्याच्या दिशेने ही योजना महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.(Solar Pump)
अर्ज व बसवलेल्या पंपांची स्थिती
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून २७ हजार ५८० अर्ज प्राप्त झाले.
त्यापैकी ८ हजार ६७१ शेतकऱ्यांनी आपला लाभार्थी हिस्सा भरला.
४ हजार २१८ सौर पंपांचे पॅनेल बसवण्यात आले असून, ३ हजार २९१ पंप कार्यान्वित झाले आहेत.
विभागनिहाय प्रगती
विभाग | अर्जांची संख्या | लाभार्थी हिस्सा भरले | पंप बसवले | सुरू झालेले पंप |
---|---|---|---|---|
लातूर विभाग | ८,४०७ | २,४९८ | १,३०० | १,०१४ |
निलंगा विभाग | ८,२१९ | २,५४८ | १,१४२ | ८८७ |
उदगीर विभाग | १०,९५४ | ३,६२५ | १,७७६ | १,३९० |
योजनेचा फायदा
या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सतत वीजपुरवठ्याची गरज भासत नाही. सौर उर्जेचा वापर केल्याने वीज बिलाचा भार कमी होत असून, पाण्याची उपलब्धता वाढते. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढून शेती अधिक फायदेशीर ठरते.
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपला हिस्सा भरलेला नाही, त्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.