Join us
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या शेतकऱ्यांना दिलासा, आता आधुनिक प्रयोगशाळेत होईल अन्न, माती, पाणी तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 15:32 IST

Agriculture News : नंदुरबार जिल्ह्यातच आता अन्न तपासणी आणि शेतकऱ्यांसाठी पाणी आणि माती तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या आहेत.

नंदुरबार : जिल्ह्यातच आता अन्न तपासणी आणि शेतकऱ्यांसाठी पाणी आणि माती तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या आहेत. यामुळे अन्न नमुन्यांची लागलीच तपासणी होऊन अहवाल मिळू शकणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही माती आणि पाणी परीक्षणाचा अहवाल तत्काळ मिळून पीक व्यवस्थापन करण्यासाठी सोयीचे होणार आहे. 

यापूर्वी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोग शिवाय अन्न नमुने शाळेवर देखील अवलंबून राहावे लागत होते. तपासणीसंदर्भातदेखील अशीच स्थिती होती. त्यामुळे मोठ्चा अडचणी येत होत्या. आता दोन्ही प्रयोगशाळा स्थानिक ठिकाणीच झाल्याने सोय झाली आहे. यामुळे वेळ आणि खर्चही वाचणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा वार्षिक विकास आराखडाअंतर्गत निधी उपलब्ध...दोन्ही प्रयोगशाळांसाठी जिल्हा वार्षिक विकास आराखडाअंतर्गत निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यानुसार निधी उपलब्ध झाल्यानंतर गेल्या वर्षी बांधकामाला सुरुवात झाली. आता सर्व अत्याधुनिक उपकरणे या ठिकाणी उपलब्ध झाली आहेत.

अन्न नमुन्यांची तपासणी जलद व सुलभ होणारमाती व पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळेत मातीतील १२ महत्त्वाच्या घटकांची तपासणी कशी केली जाते, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. शेतकऱ्यांना माती व पाण्याच्या गुणवत्तेची अचूक माहिती मिळून पीक व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक पद्धतीने करता येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Nandurbar Farmers: Modern Lab for Food, Soil, Water Testing

Web Summary : Nandurbar farmers rejoice! New food, soil, and water testing labs are now operational, providing quick reports for better crop management. These labs, funded by district development, save time and money, ensuring accurate soil and water quality information for scientific farming.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनंदुरबार