Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब शेतीतील राजा माणूस, तब्बल 50 वर्षे गुलाब शेतीतून 130 जातींचे संवर्धन, आजही पाच एकर गुलाबाची शेती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:35 IST

Rose Farming : वयाची पंचाहत्तरी ओलांडली असून ५० वर्ष गुलाब शेतीचा अनुभव असल्याने काही मिनिटात ते आजही कलम बांधतात.

- अनिरुद्ध पाटील नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीज तर्फे आयोजित ६३ व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात डहाणूतील बबन चुरी यांना गुलाबाचा राजा (बेनवेन,ऑरेंज या जात) व गुलाबाची राणी (मॅकरडन्सी, पिंक जात) पुरस्काराने गौरविण्यात आले.    डहाणू तालुक्यातील बावडा येथे सुमारे पाच एकरात गुलाब शेती असून दिवसाला विविध रंगाची सुमारे ३ हजार आणि गावठी गुलाबांची ९ हजार फुले काढतात. १९७७ साली वसईच्या आगाशी येथील मेव्हणे देवराव पाटील यांनी १८० गुलाबाची रोपे भेट देत फूलशेतीसाठी प्रोत्साहित केले. १९७८ साली इंग्लिश गुलाबांची १० रोपे भेट दिली, तर २०५ रोपे पुणे येथून आणली. 

पाटील यांनी त्यांना कलम बांधणीचे तंत्र शिकवले आणि विविध गुलाब प्रदर्शनातील सहभागासाठी प्रोत्साहित केले. तर पत्नी शैला यांनी अनेक वर्ष फुलविक्री करून सहकार्य केले. पाचु रोझेस या नर्सरीतून ते गुलाब कलमे विक्री करतात. २००२ पर्यंत त्यांच्याकडे ३५० गुलाबांच्या जाती होत्या, मात्र महापुरात त्यापैकी काही नष्ट झाल्याने आजही १३० जाती त्यांच्याकडे आहेत.   त्यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली असून ५० वर्ष गुलाब शेतीचा अनुभव असल्याने काही मिनिटात ते आजही कलम बांधतात. मुलगा विशाल वडिलांप्रमाणेच शेतीतील प्रयोगशीलतेसाठी ओळखला जातो. कृषी विभागाने त्यालाशेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविले आहे. याच ठिकाणी बेस्ट डिस्प्ले आणि इतर १४ बक्षिसांवर नाव कोरत स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसांचे मानकरी ठरले. त्यांना एकूण चार ट्रॉफी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट चेतन देसाई व माजी गव्हर्नर हरजितसिंग तलवार तसेच अशोक कोठारी, अरुण सावंत, चेअरमन चंद्रकांत साळुंके यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले.    गुलाबाने दिले अनेक पुरस्कार १९८० साली पहिल्यांदा गुलाबाचा राजा आणि गुलाबाची राणी हा पुरस्कार मिळाला. त्यांनतर सलग १९९८ पर्यंत नाव कोरले. राष्ट्रीयस्तरावर चार वेळा हे दोन्ही पुरस्कार पटकावले. तर १९९९ साली जयपूर येथील आशियायी किंग ऑफ द रोजशो या प्रदर्शनात गुलाबाचा राजा (ग्ल्याडीएटर जात) हा पुरस्कार मिळवला. २५ वर्षानंतर यंदा पुन्हा त्यांनी गुलाबाचा राजा व गुलाबाची राणी पुरस्कार पटकावत दैदिप्यमान यश मिळवल्याने कौतुक होत आहे.      "सुमारे पन्नास वर्ष गुलाब शेतीतील अभ्यास व अविरत मेहनतीने हे यश मिळाले. त्यामध्ये मेव्हणे देवराव पाटील, पत्नी शैला, मुलगा विशाल व सून तृप्ती यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले."- बबन चुरी (शेतकरी, गुलाब शेती, डहाणू)

English
हिंदी सारांश
Web Title : Rose Farmer: 50 Years, 130 Varieties, Still Cultivating Five Acres

Web Summary : Baban Churi, a rose farmer from Dahanu, honored for cultivating 130 rose varieties over 50 years, still farms five acres. He received awards for his 'Rose King' and 'Rose Queen' varieties, showcasing his dedication and success in rose cultivation.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपालघरफुलशेती