Join us

औषधी निर्मितीत मोह फुलांचा महत्वाचा वाटा, अनेकांना रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 1:29 PM

अर्जुनी मोरगाव तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यात मोहफुल संकलन करण्यास सुरुवात झाली आहे. 

गोंदिया : गोंदिया जिल्हा म्हणजे निसर्गाची खाण आहे. अतजमीन, जंगल ह्या गोष्टीत परिपूर्ण असलेला हा जिल्हा वनराईने परिपूर्ण आहे. त्यात अर्जुनी मोरगाव तालुका घनदाट जंगलाने परिपूर्ण आहे. येथील जंगलात विविध प्रजातीचे मोठमोठी वृक्ष व औषधीयुक्त झाडे ही तालुक्याचे वैभव आहे. या सर्व झाडांमध्ये मोहफुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने व मोहफुल संकलनामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. औषधी निर्मितीत मोहफुलाचा महत्त्वाचा वाटा आहे.

मोहफुल संकलनामुळे अनेक लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटत असतो. आदिवासी व इतर समाज मोठ्या प्रमाणात मोहफूल संकलित करून व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करतात. मोहफुलावर प्रक्रिया करणारे उद्योग आले नसल्याने जनतेची फार होरपळ होत असते, मोहफुलांची झाडे सुरुवातीस मोहफुलाचे उत्पादन देतो, तर लगेच टोरी बियांचे ही दुहेरी उत्पादन होते. या टोरी बियांपासून औषधीयुक्त तेलाची निर्मिती होत असल्याची माहिती आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यात मोहफुल संकलन करण्यास सुरुवात झाली आहे. 

गोंदिया जिल्ह्यात मोहफुलाला रानमेवा म्हणतात. तर विदर्भातील लोकांसाठी ते कल्पवृक्षापेक्षा कमी नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलांचे उत्पादन होत असुन त्याचे संकलन गावकरी करतात. तर मोहफुलांपासून विविध खाद्यपदार्थ सुद्धा तयार केले जातात. या मोहफुलामुळे आदिवासी व दुर्गम भागात गावकऱ्यांना रोजगार मिळतो. औषधांच्या निर्मितीत ही मोहफुलांचा महत्वपूर्ण वाटा आहे.

मोहफुलावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची गरज

अर्जुनी मोरगाव तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलांचे उत्पादन व संकलन होत असते. पण त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा अभाव आहे. धानावर व मोहफु- लावर प्रक्रिया करणारे उद्योग जर जिल्ह्यात आले तर धानाला व मोहफुलाला योग्य भाव मिळून अनेकांना रोजगार मिळू शकतो.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डफुलंगडचिरोलीआदिवासी विकास योजना