Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं यूडीआयडी कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, अनुदान होईल बंद, ई-केवायसी कशी करावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:29 IST

Linking UDID Card : यूडीआयडी (युनिक डिसअॅबिलिटी आयडी) कार्ड आधारशी लिंक करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

गडचिरोली : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यूडीआयडी (युनिक डिसअॅबिलिटी आयडी) कार्ड आधारशी लिंक करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

ई-केवायसीद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत लिंकिंग न केल्यास दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध योजनांचे अनुदान व लाभ थांबण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

...अन्यथा अनुदान बंदज्या लाभार्थ्यांनी अद्याप यूडीआयडी कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, त्यांचे अनुदान शासनाकडून थांबविले जाऊ शकते. यामुळे मासिक पेन्शन, शैक्षणिक सवलती, आरोग्यविषयक सुविधा व इतर आर्थिक लाभांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

ई-केवायसी कशी करावी?जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) किंवा महा-ई-सेवा केंद्रावर भेट द्या. सोबत आधार कार्ड आणि यूडीआयडी कार्ड घेऊन जा. केंद्रावर बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) किंवा ओटीपीद्वारे पडताळणी केली जाईल. संबंधित माहिती पोर्टलवर अद्ययावत करून लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाईल

आवश्यक दस्तावेज अपलोड करणे गरजेचेशेवटच्या क्षणी केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळेतच प्रक्रिया पूर्ण करावी. विशेषतः ग्रामीण भागातील दिव्यांगांनी विलंब न करता जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करावी, दस्तावेज अपलोड करावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

नेमके काय आहे यूडीआयडी कार्ड ?यूडीआयडी (युनिक डिसअॅबिलिटी आयडी) हे दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारकडून दिले जाणारे राष्ट्रीय ओळखपत्र आहे. या कार्डमध्ये संबंधित व्यक्तीच्या अपंगत्वाची संपूर्ण माहिती नोंदवलेली असते. शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी हे एकच अधिकृत व सार्वत्रिक दस्तऐवज म्हणून वापरले जाते. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीकडे यूडीआयडी कार्ड असणे आवश्यक मानले जात आहे.

 

 रॉकेल वाटपासाठी पुरवठा विभागाकडून घरोघरी सर्व्हे, 'ही' अट बंधनकारक, तरच मिळणार रॉकेल

 

English
हिंदी सारांश
Web Title : Link UDID to Aadhaar or Disability Benefits May Stop!

Web Summary : Divyang beneficiaries must link their UDID card with Aadhaar by March 31, 2026, to continue receiving benefits. Failure to do so may result in the suspension of pensions, educational concessions, and healthcare benefits. Complete e-KYC at Aaple Sarkar, CSC, or Maha-E-Seva centers.
टॅग्स :शेती क्षेत्रअपंग विकास महामंडळ वाशिमआधार कार्ड