Join us

Kharif Crops: खरीप पिकांचे नवे समीकरण: कापसाऐवजी 'या' पिकांना पसंती! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:45 IST

Kharif Crops : खरीप हंगामासाठी पीक पद्धतीत मोठा बदल होत आहे. कापसाच्या (Cotton) दरातील सातत्यपूर्ण घसरण आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी यंदा कापसाऐवजी कोणत्या पिकांना मिळणार पसंती ते वाचा सविस्तर. (Kharif crops)

Kharif Crop : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक पद्धतीत मोठा बदल घडत आहे. कापसाच्या दरातील सातत्यपूर्ण घसरण आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी यंदा कापसाऐवजी(Cotton) सोयाबीन, मका आणि तुरीकडे वळताना दिसत आहेत.(Kharif crops)

कृषी विभागाच्या अंदाजानुसार कापसाचे क्षेत्र सुमारे २१ हजार हेक्टरने घटणार असून, सोयाबीनच्या क्षेत्रात तब्बल १४४ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.(Kharif crops)

नगदी पीक म्हणून शेतकरी कापूस(Cotton) लागवडीला प्राधान्य देतात. काही वर्षापासून कापसाचे दर सतत घटत आहेत. शिवाय लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत खर्च विचारात घेता कापूस परवडत नसल्याचे दिसून येते.(Kharif crops)

यामुळे यंदा जिल्ह्यातील कापसाचे(Cotton) क्षेत्र सुमारे २१ हजार ३४६ हेक्टरने घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व बैठक झाली.

या बैठकीत खरीप हंगामातील संभाव्य पीक पेरणीची माहिती देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे ६ लाख ८६ हजार ५६२ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणी होते.

यंदाही एवढ्याच क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. मात्र पीक पद्धतीत बदल होणार असल्याचे नमूद करण्यात आले. मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात सुमारे ३ लाख ८७ हजार १४६ हेक्टरवर कापूस(Cotton) पीक घेतले जात होते.

तीन वर्षांपासून कापसाला(Cotton) मिळणारा दर आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ जमत नसल्याने शेतकऱ्यांचे कापसावरील प्रेम कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षीपासून सरकी(Cotton) लागवड घटत चालली आहे. यंदा सुमारे २१ हजार ३४६ हेक्टर क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. एकीकडे कापसाचे क्षेत्र घटत असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी जिल्ह्यात केवळ २४ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक होते. यंदा हे क्षेत्र ३५ हजार १२५ हेक्टरपर्यंत जाईल असा अंदाज आहे.

सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ होण्याचा अंदाज

सोयाबीनच्या पेऱ्यात १४४ टक्के वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. तुरीला मागील वर्षी चांगला दर मिळाला होता. तुरीचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मका पिकालाही शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. यंदा सुमारे १ लाख ९२ हजार ५१२ हेक्टरवर मका लागवड होईल.

ज्वारी हद्दपार होण्याच्या मार्गावर

जिल्ह्यात ३० वर्षापूर्वी खरीप ज्वारीचा पेरा चांगला होता. मात्र खरीप ज्वारी खाण्यासाठी वापरली जात नाही. केवळ जनावरांच्या चारा मिळतो म्हणून शेतकरी आता ज्वारीची पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात केवळ साडेसहाशे हेक्टरवर ज्वारीची पेरणी होण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kharif Season: खरीप पेरणीचे 'इतके' हेक्टरवर क्षेत्र प्रस्तावित! वाचा 'या' जिल्ह्याचे खरीप नियोजन सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रखरीपपीकसोयाबीनतुराहरभराज्वारीकापूस