Gram Panchayat : महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्षात काम न करताच बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या आणि बोगस बिलांद्वारे लाखो-करोडोंचा निधी लाटण्याचे प्रकार समोर येत आहेत. तुमच्याही गावात, ग्रामपंचायतीत असे चुकीची कामे झाले असतील तर कशी ओळखायची, त्याची तक्रार कुठे करायची हे पाहुयात...
काम प्रत्यक्ष झाले आहे का ते तपासा
- बिलात दाखवलेले काम (रस्ता, गटार, लाईट, पाण्याची टाकी) ग्राउंडवर आहे का?
- कामाची लांबी, रुंदी, मटेरियल बिलाशी जुळते आहे का ते पहा.
- Measurement Book तपासा
- प्रत्येक कामाची नोंद Measurement Book मध्ये असते.
- Measurement Book मध्ये मोजमाप जास्त आणि प्रत्यक्ष काम कमी
ठराव तपासात्या कामासाठी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे का? ठराव नसताना खर्च दाखवला असेल तर गडबड असू शकते.
खर्च तपासा मंजूर अंदाजपत्रक आणि बिलातील रक्कम याची तुलना करा. खूप जास्त फरक असेल तर चौकशी करा.
GST Bill/Vendor तपासा
- बिल देणारा पुरवठादार खरा आहे का?
- GST नंबर तपासून पहा.
फोटो व जिओटॅग पुरावे
- अनेक कामांमध्ये Before/After फोटो असतात.
- फोटो जुने /दुसऱ्या गावाचे असतील तर...
RTI करून माहिती गोळा करा
- आराखडा पत्रक, वर्क ऑर्डर, MB copy, Bill & Voucher इत्यादी.
- प्रत्येक कामासाठी वर्क ऑर्डर दिली जाते.
- काही वेळा एकच बिल नंबर दोनदा वापरतात.
- Voucher नोंदी तपासून घ्या.
- काम न करता बँकेतून पैसे काढून बिल अड्जस्ट करतात.
- बँक व्यवहार नोंदी माहिती अधिकाराखाली मागवू शकता.
तक्रार कुठे करावी ?
- बीडीओ (गटविकास अधिकारी)
- जिल्हा परिषद मुख्याधिकारी
- जिल्हाधिकारी कार्यालय
- ACB (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्षात काम न करताच बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या आणि बोगस बिलांद्वारे निधी लाटण्याचे प्रकार केले जात आहेत. अशावेळी तुम्हीही वरीलप्रमाणे माहिती घेऊन बनावट कामांचा भ्रष्टाचार बाहेर आणू शकता.
Web Summary : Gram Panchayats often misuse funds via fake bills. Verify work completion, check resolutions, compare costs, and inspect GST details. Use RTI for information and report to authorities.
Web Summary : ग्राम पंचायतें अक्सर नकली बिलों से धन का दुरुपयोग करती हैं। कार्य पूरा होने की पुष्टि करें, प्रस्तावों की जांच करें, लागतों की तुलना करें और जीएसटी विवरण का निरीक्षण करें। सूचना के अधिकार का उपयोग करें और अधिकारियों को रिपोर्ट करें।