Gas Leak Issue : जर तुम्हाला घरात शिरल्यावर किंवा स्वयंपाकघरात गॅसचा मंद वास सतत जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा वास 'इथाईल मरकॅप्टन' या रसायनाचा असतो, जो केवळ गळती ओळखण्यासाठी गॅसमध्ये मिसळला जातो. सततचा वास हा पाइपला छिद्र असल्याचे किंवा गॅस बर्नर अर्धवट सुरू असल्याचे लक्षण असू शकते.
बहुतेक प्रकरणांमध्ये सिलिंडरचा स्वतःहून स्फोट होत नाही तर, गळती झालेला गॅस घरात साचतो आणि एखाद्या ठिणगीमुळे आग लागते. ही आग सिलिंडरपर्यंत पोहोचली आणि त्यातील दाब प्रचंड वाढला की मग सिलिंडरचा भीषण स्फोट होतो. रबरी नळी कापली जाणे किंवा गॅस चालू ठेवून विसरणे ही स्फोटाची मुख्य कारणे आहेत.
गॅसचा वास आल्यास काय करावे?सर्वात आधी रेग्युलेटरचे बटण बंद करा, घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडून द्या, जेणेकरून गॅस बाहेर निघून जाईल, गॅसचा वास येत असताना विजेचे कोणतेही स्वीच सुरू किंवा बंद करू नका, लायटर, काडीपेटी किंवा मेणबत्तीचा वापर टाळा, तत्काळ तुमच्या गॅस एजन्सीच्या हेल्पलाइन नंबरवर किंवा आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधा.
खबरदारीचे पाच नियम !
- पाइपची तपासणी : दर दो वर्षांनी गॅसची रबरी नळी (आयएसआय मार्क असलेली) बदलणे अनिवार्य आहे.
- रेग्युलेटर बंद ठेवा : रात्री झोपताना आणि घराबाहेर जाताना रेग्युलेटरचे बटण नेहमी बंद ठेवा.
- उंचीवर ठेवा : गॅस शेगडी नेहमी सिलिंडरच्या पातळीपेक्षा उंच ठिकाणी असावी.
- स्वच्छता : गॅस बर्नरची छिद्रे वेळोवेळी स्वच्छ ठेवा, जेणेकरून गॅसचा प्रवाह सुरळीत राहील.
- थेट ऊन टाळा : सिलिंडरला थेट उष्णता किंवा सूर्यप्रकाश लागेल अशा ठिकाणी ठेवू नका.
गॅस सिलिंडर हाताळताना 'सुरक्षा' हाच सर्वांत मोठा बचाव आहे. अनेकदा नागरिक गॅसचा वास आल्यावर घाबरून विजेचे पंखे किंवा दिवे सुरू करतात, ज्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागते. प्रत्येक कुटुंबाने गॅस एजन्सीकडून ठरावीक काळानंतर 'सेफ्टी चेक' करून घेणे गरजेचे आहे.- सदाशिव राऊत, गॅस रिपेरिंग सेंटर
Web Summary : If you smell gas, immediately turn off the regulator, ventilate the house, and avoid electrical switches or flames. Regularly check gas pipes, keep the regulator closed when not in use, and ensure proper ventilation. Safety checks are crucial to prevent accidents.
Web Summary : यदि आपको गैस की गंध आती है, तो तुरंत रेगुलेटर बंद करें, घर को हवादार बनाएं और बिजली के स्विच या आग से बचें। नियमित रूप से गैस पाइपों की जांच करें, उपयोग में न होने पर रेगुलेटर बंद रखें, और उचित वेंटिलेशन सुनिश्चित करें। दुर्घटनाओं को रोकने के लिए सुरक्षा जांच महत्वपूर्ण हैं।