Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात करा सहहिस्सेदाराच्या शेतजमिनीचे विभाजन, शासनाचा जीआर आला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:40 IST

Agriculture News : जमिनीच्या हिश्श्यांच्या विभाजन करिता विशेष मोहीम राबविण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत.

दिंडोरी : सातबारा उताऱ्यावरील सामायिक खात्यातील व्यक्तीसमोर त्याच्या हिश्श्याचे शेत जमिनीचे क्षेत्र नमूद नसल्याने सद्यस्थितीत अॅग्री स्टॅक संकल्पना राबवताना तसेच जमीन खरेदी-विक्री व्यवहार, फेरफार नोंदी, पीक पाहणीची नोंद आदी अडचणी खातेदारांसह महसूल प्रशासनासमोर येत आहेत. 

त्यामुळे महसुल विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ८५ नुसार शेत जमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्यांच्या विभाजन करिता विशेष मोहीम राबविण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिंडोरी तालुक्यात विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.

सातबारा उताऱ्यावरील सामायिक क्षेत्र असलेल्या प्रत्येक खातेदाराच्या हिश्श्यांची स्वतंत्र नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्काबाबत खातेदारांमध्ये अधिक सुलभता व स्पष्टता येण्यास मदत होणार आहे. शेतजमिनीवर एका पेक्षा जास्त खातेदार सहहिस्सेदार आहेत. संमतीने खातेदारांमध्ये खातेफोड पूर्ण न झाल्याने सातबारा उताऱ्यावर सर्व खातेदारांची सामायिक क्षेत्र दर्शविण्यात आलेले आहे. 

शासनाच्या विविध योजनांची माहिती अंमलबजावणी करताना महसूल प्रशासनाला अडचणी येत होत्या. त्यामुळे दिंडोरी उपविभागात विशेष मोहीम राबवून एकाहून अधिक  सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्श्याच्या विभाजन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मोहिमेचा लाभ घ्यावाविशेष मोहिमेमध्ये या सर्व अडचणी सोडवण्यास मदत होणार आहे. यामुळे सर्व खातेदारांच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाणार आहे. शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करताना शेत जमिनीची अचूक जोडणी प्रत्येक व्यक्ती समोर त्याच्या हिश्श्याची शेतजमीन त्याच्या नावासमोर नमूद होणार आहे.

 

जमीन एनए परवानगीसंदर्भातील जीआरबाबत अस्पष्टता, जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढले, पण...

 

English
हिंदी सारांश
Web Title : Divide co-owned farmland in a day; government GR issued.

Web Summary : Maharashtra government launches special campaign to divide co-owned farmland, ensuring clear land ownership. This initiative simplifies land transactions and benefits farmers by accurately recording individual shares on land records. Dindori farmers are encouraged to participate.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीजमीन खरेदी