Join us

Cotton Soyabean Anudan : कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांनो, ई पीक पाहणी नसल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 18:01 IST

Cotton Soyabean Anudan : ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सातबारा उताऱ्यावर या लागवडीची नोंद आहे.  अशा शेतकऱ्यांना.....

Cotton Soyabean Anudan : कापूस आणि सोयाबीन (Cotton Soyabean Subsidy) अनुदानाबाबत एक महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला आहे. सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूससोयाबीन या पिकाची लागवड केली आहे. व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सातबारा उताऱ्यावर या लागवडीची नोंद आहे.  अशा शेतकऱ्यांना देखील अर्थसहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी (E Pik Pahni) पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात येऊन, अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

दि.२३ सप्टेंबर, २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या निदेशाच्या अनुषंगाने, राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढीलप्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत.

  • सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतक-यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र, संबंधित तलाठी यांच्याकडे ७/१२ उताऱ्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
  • ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमती पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर, त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.
  • महा आयटीने ई-पिक पाहणी पोर्टल वरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेटेज ९०% पर्यंत अनुज्ञेय ठेवणेबाबतची कार्यपध्दती वगळण्यात येत आहे.
  • सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुज्ञेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.
  • सदर योजनेंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदारांकरिता प्रति पिक २ हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात यावी. 
टॅग्स :कापूससोयाबीनशेती क्षेत्रशेती