Urea Fertilizer : केंद्र सरकारने युरिया खताबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सल्फर कोटेड युरियाची ४० किलो बॅगेची २५४ रुपये अशी कमाल विक्री किंमत निश्चित केली आहे.
हा निर्णय खत (अकार्बनिक, सेंद्रिय किंवा मिश्रित) (नियंत्रण) आदेश, 1985 अंतर्गत अधिसूचित करण्यात आला आहे आणि आदेश जारी केल्याच्या तारखेपासून लागू झाला आहे. त्यावर सहसचिव फ्रँकलिन एल. खोबुंग यांनी स्वाक्षरी केली आहे.
कृषी मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार ही निश्चित किंमत देशभरातील डीलर्स, उत्पादक, आयातदार तसेच पूल हँडलिंग एजन्सींमार्फत चहा, कॉफी, रबर उत्पादक आणि इतर सर्व शेतकऱ्यांना लागू राहणार आहे. शेतकऱ्यांना युरिया ठरावीक आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावा, तसेच काळाबाजार आणि दरवाढीला आळा बसावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
जीएसटी वेगळा आकारला जाणारमंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, २५४ रुपयांची ही कमाल किंमत जीएसटी किंवा इतर केंद्र व राज्य करांचा समावेश न करता निश्चित करण्यात आली आहे. लागू असल्यास, हे कर विक्रीवेळी वेगळ्या स्वरूपात आकारले जाऊ शकतात.
लहान बॅगासाठी अतिरिक्त शुल्कडीलर्सना लहान वजनाच्या युरिया पिशव्यांवर पॅकिंग शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार २ किलोच्या पिशवीसाठी १.५० रुपये, ५ किलोसाठी २.२५ रुपये, १० किलोसाठी ३.५० रुपये आणि २५ किलोच्या पिशवीसाठी ५ रुपये इतके अतिरिक्त शुल्क आकारता येणार आहे.
Web Summary : The government fixed the maximum selling price of sulfur-coated urea at ₹254 for a 40 kg bag. This price excludes GST and other taxes. Dealers can charge extra for smaller bags, ensuring urea availability at affordable rates for farmers nationwide.
Web Summary : केंद्र सरकार ने सल्फर कोटेड यूरिया की 40 किलो की बोरी का अधिकतम विक्रय मूल्य ₹254 निर्धारित किया है। इस मूल्य में जीएसटी और अन्य कर शामिल नहीं हैं। डीलर्स छोटे बैग के लिए अतिरिक्त शुल्क ले सकते हैं, जिससे किसानों को सस्ती दरों पर यूरिया उपलब्ध हो सके।