Join us

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहिण योजनेसाठी आता सरकारचे नवे निकष; काय आहेत निकष? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 19:34 IST

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे. यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे. यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे.

पात्र महिलांनाच लाभ मिळवा यासाठी सरकारकडून आता कठोर पाऊले उचलली जात आहे. प्रत्येक महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाली आहे. तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळवा यासाठी काही नवे नियम देखील लागू केले जात आहेत.

काय आहेत नवीन अपडेट

  • लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करावी लागणार आहे.
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत दिवसागणिक वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे. विविध कारणांतून ५ लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्यानंतर सरकार निकषांची आणखी कठोर अंमलबजावणी करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
  • या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या मात्र तरीही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू आहेत.
  • ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांचा या योजनेतून पत्ता कट केला जाणार आहे.
  • लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे की नाही, हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे समजते.
  • योजनेत पारदर्शकता राहावी, यासाठी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करावी लागणार आहे.
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. त्यानंतर योजनेतील पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. 
  • ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती आहे.

दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे.

अपात्र ठरविण्यात आलेले लाभार्थीसंजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला : २,३०,०००वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला : १,१०,०००कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला : १,६०,०००एकूण अपात्र महिला : ५,००,०००

टॅग्स :लाडकी बहीण योजनेचामहिलाराज्य सरकारआधार कार्डइन्कम टॅक्ससरकारी योजनाबँक