Join us

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; बँक खात्यात जमा झालेले पैसे परत घेणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:14 IST

कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मुंबई : कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही.

तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत १५०० रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला.

मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबविली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजेतून वगळण्यात येत आहे.

२८ जून २०२४ व दि. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ झालेल्या अपात्र महिलांनी पैशांची परतफेड सुरू केल्याने राज्य सरकारने वित्त खात्यांमध्ये नवीन लेखाशीर्ष (खाते) उघडले आहे.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या अंदाजानुसार या योजनेसाठी पात्र नसतानाही लाभघेतलेल्या सुमारे एक लाख महिला त्यांना मिळालेले पैसे परत करण्यासाठी पुढे आल्या आहेत.

महिला व बालविकास विभागाने सर्व जिल्हा कार्यालयांना एक नवीन खाते उघडण्याबाबत नुकतेच सूचित केले आहे. या खात्यात अपात्र महिलांकडून परत केलेले पैसे जमा केले जातील. सरकारी प्रक्रियेनुसार एखाद्या विशिष्ट कारणासाठी पैसे खर्च किंवा जमा करायचे असल्यास खाते उघडावे लागते.

तसेच सरकारकडे येणारा पैसाही नेमलेल्या लेखाशीर्षाखाली जमा करावा लागतो. त्यामुळे आतापर्यंत महिलांनी परत केलेले पैसे जमा करण्यासाठी कोणतेही खाते उघडण्यात आले नव्हते.

या योजनेसाठी राज्य सरकारने ठरवलेल्या निकषांनुसार २.५ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या ६५ वर्षांखालील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. 

लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या महिलासंजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला : २,३०,०००६५ पेक्षा जास्त वय असलेल्या वयोवृद्ध महिला : १,१०,०००कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला : १,६०,०००

इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार पाच लाख महिलांना या योजनेतून आतापर्यंत वगळले आहे. - अदिती तटकरे, महिला व बालविकासमंत्री

टॅग्स :लाडकी बहीण योजनेचामहिलासरकारी योजनाराज्य सरकारमंत्रीअदिती तटकरे