Ladki Bahin Yojana New Update : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्यातील १ हजार ५०० रुपये कधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.मात्र, आता बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी ३ हजार हजार रुपये जमा होणार आहे. डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते पावणेतीन कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.
सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे.
लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली.विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहतायत.
लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत. त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.तर दुसरीकडे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढीव हफ्ता देण्याबाबत निर्णय होणार असल्याचेही समजते. त्यामुळे बहिणींची संक्रांत यंदा गोड होणार आहे.