Join us

ladki bahin yojana: लाडक्या बहिणींनो! तुम्हालाही मिळणार 'या' योजनेचा लाभ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:35 IST

ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (ladki bahin yojana) पात्र कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा लाभ आता पात्र महिलांना मिळत आहे. वाचा सविस्तर

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (ladki bahin yojana) पात्र कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Chief Minister Annapurna Scheme) हाती घेण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार २३९ कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे.

या योजनेत राज्यातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी दिली जाते. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार २३९ लाभार्थी कुटुंबांना वार्षिक तीन सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

५५ हजार लाभार्थी कुटुंबाची केवायसी पूर्ण

जिल्ह्यातील उज्ज्वला जोडणीधारकांची केवायसी पूर्ण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यातील ५५ हजार २३९ लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली असून या लाभार्थ्यांना ३ मोफत सिलिंडरचा लाभ देण्यात येत आहे.

योजनेसाठी पात्रता काय ?

* मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी गॅस जोडणी महिलेच्या नावे असणे आवश्यक आहे.

* मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थ्यांचे कुटुंब योजनेसाठी पात्र असणार आहे. या कुटुंबास मोफत तीन वेळा सिलिंडर पुनर्भरण करुन मिळेल.

* कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेली गॅस जोडणी लाडकी बहिणीला स्वतःच्या नावे करून घ्यावी लागणार आहे. एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल.

७५ हजार उज्ज्वला गॅस जोडणी

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत केले जाते. जिल्ह्यात उज्ज्वला गॅस जोडणीधारकांची संख्या ७५ हजार ४०८ एवढी आहे.

धुरापासून होणार मुक्तता

काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरे सिलिंडर येईपर्यंत स्वयंपाकासाठी साधन उपलब्ध होत नाही. परिणामी चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. आता वर्षभरात ३ सिलिंडर मिळणार असल्याने धुरापासून मुक्तता मिळणार आहे.

३,०७,२९० लाडक्या बहिणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३ लाख २४ हजार ४१४ लाभार्थ्यांनी पोर्टल व ॲपच्या माध्यमातून अर्ज केले होते. यापैकी ३ लाख ७ हजार २९० अर्ज पात्र ठरले असून या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे.

लाडकी बहीण व अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी

लाडकी बहीण व अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी३,०७,२२०
उज्ज्वला गॅस जोडणीधारक७५४०८
केवायसी पूर्ण गॅस जोडणीधारक५५२३९

हे ही वाचा सविस्तर : Umed Mall: राज्यातील बचतगटांना मिळणार हक्काची बाजारपेठ; काय आहे निर्णय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमहिलामहिला आणि बालविकासलाडकी बहीण योजनेचागॅस सिलेंडरसरकारी योजना