Join us

ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना! नव्या वर्षात मिळणार का २१००? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:53 IST

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा सहावा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. परंतु, या योजनेचे २१०० रुपये कधीपासून खात्यात जमा होतील? असा प्रश्न या योजनेतील लाभार्थी महिलांना पडला आहे.

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा(Ladki Bahin Yojana) सहावा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. परंतु, या योजनेचे  २१०० रुपये कधीपासून खात्यात(Installment) जमा होतील? असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना पडला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जात आहेत.

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता २ कोटी ३४ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. याशिवाय नव्याने अर्ज करणाऱ्या महिला आधार कार्डच्या माध्यमातून बँक खाते लिंक करणाऱ्या १२ लाखांहून अधिक महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने वचन दिले होते की, जर महायुती पुन्हा सत्तेत आली, तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २१०० रुपये दरमहा दिले जातील. त्यामुळे महिलांना या रक्कमेची प्रतीक्षा लागल्याचे सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे समोर आले आहे.

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे(Aditi Tatkare) यांनी  दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १५०० रुपयांमध्ये वाढ करून २१०० रुपये केले जाऊ शकते. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना २१०० रुपये देण्याचे वचन पुर्ण केले जाणार आहे. त्यामुळे महिलांना ६०० रुपयांची वाढीव रक्कम  मिळणार आहे.

परंतु, राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीने पैसे वाढवणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे जानेवारी महिन्यातही पैसे वाढवण्याची शक्यता मावळली आहे.मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे, त्यानंतर या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थसंकल्पात निधीची घोषणा केल्यानंतर लाभार्थी महिलांना २१०० रुपये दिले जातील.

त्यामुळे २१०० रुपयांचा हफ्ता मार्च अथवा एप्रिल महिन्यापासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतात.

राज्यातील गरजू महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गरिब कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.हे ही वाचा सविस्तर : Ladki Bahin Yojana : प्रतीक्षा संपली, लाडकी बहिणींना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर 

टॅग्स :शेती क्षेत्रलाडकी बहीण योजनेचासरकारसरकारी योजनामहिला आणि बालविकासमहिला