Join us

शेतकऱ्यांसाठी एकरी १५००० देणारी रयधू भरोसा योजना या ५ राज्यांमध्येही लागू करा 

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 19, 2023 6:35 PM

शेतकरी संघटनेच्या सदस्यांची मागणी

काँग्रेसनेतेलंगणामध्ये शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये देणाऱ्या रयधू भरोसा योजनेची घोषणा केल्यानंतर फक्त तेलंगणातच ही योजना कशासाठी असा सूर शेतकरी संघटनांमधून येत आहे. कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश तसेच मध्य प्रदेश या 'काँग्रेसच्या राज्यांमध्ये' ही लागू करा असे पत्र शेतकरी संघटनेचे सदस्य विजय जावंघिया यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना केली.

तेलंगणातील राज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद शहरात रविवारी राहुल गांधी यांनी रयधू भरोसा योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रति एकर व शेतमजुरांना बारा हजार रुपये देण्याचे वचन देण्यात आले. परंतु ही योजना केवळ तेलंगणातच नव्हे तर कर्नाटक राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही लागू करण्यात यावी अशी मागणी विजय जावंघिया यांनी केली आहे.

भारत राष्ट्र समितीच्या तेलुगु रयधू बंधू योजनेसारखीच ही योजना असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष निवडून आलेल्या सर्व राज्यांमध्ये शेतकरी व मजूर यांच्यासाठी एकसंघीय असावी असेही पत्रात लिहिण्यात आले आहे.

पत्रात नेमके काय?

टॅग्स :सरकारी योजनाकाँग्रेसशेतकरीतेलंगणानिवडणूकशेती क्षेत्र