Join us

कृषी महाविद्यालय रिसोडमध्ये महापरिनिर्वाण दिनी महामानवास विनम्र अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 12:28 PM

रिसोड येथील कृषी महामहाविद्यालयात बुधवारी डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. डॉ.पंजाबराव देशमुख सुविदे फाऊंडेशन, कृषि महाविद्यालय रिसोडद्वारें ...

रिसोड येथील कृषी महामहाविद्यालयात बुधवारी डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. डॉ.पंजाबराव देशमुख सुविदे फाऊंडेशन, कृषि महाविद्यालय रिसोडद्वारें राष्ट्रीय सेवा योजना पथक अंतर्गत सन्माननीय श्री.आर.एस.डवरे तांत्रीक समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ .बी.आर.आंबेडकर यांस विनम्र अभिवादन करण्यात  आले . 

या कार्यक्रमासाठी  प्रमुख अतिथी डॉ.शैलेश सरनाईक सहा.प्रा.डॉ.पं.दे कृ.वी.अकोला यांच्या समवेत डॉ. ए. एम . अप्तुरकर प्राचार्य, डॉ. पि . जी.देव्हडे यांच्या शुभ हस्ते भारतरत्न डॉ.बि.आर.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन सूचीता फुलउंबरकरने बाबासाहेबांचे विचार, शिकवण आणि विद्यार्थी दशेत अध्ययन हेच आद्य कर्तव्य असून प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे आणि आपले ध्येयसिध्दी गाठावी असा संदेश आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

डॉ.पी.जी.देव्हडे यांनी बाबासाहेबांचे आचार विचार आणि कार्य समाजहिताचे आणि राष्ट्रहिताच्या होते आणि त्याचमुळे दिन दुबळ्या दलित गरजू लोकांना न्याय आणि हक्क मिळवून दिले त्यानी दाखविलेला मार्गाचे आपण अवलोकन जरी केले तेव्हाच बाबासाहेबाना खरी मानवंदना,अभिवादन ठरेल असे प्रतिपादन केले.डॉ.शैलेश सरनाईक प्रमुखं अतिथी यांनी सुध्दा बाबासाहेबांचे सामजिक, शैक्षणिक राजकीय कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा बाबासाहेबांचा सन्देश देवून करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

डॉ . ए.एम.अप्तुरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.बाबासाहेब यांचे कार्य अनंत असुन आपण विचारही करू शकत नाहीं याचे दृष्टांत देताना सूर्यासमोर पंतीने काय उखान करावे या शब्दात बाबासाहेबांचे राजकीय, ऐतिहासीक, स्वतंत्रलढ्यातील कार्य, सविधानाचे शिल्पकार, सत्याग्रह इत्यादी थोर कार्यप्रणाली असुन त्यांचे कार्य संबोधन करावे तितके कमीच आहे आणि विद्यार्थ्यानी डॉ.बाबासाहेब यांनी दिलेला अभ्यासू वृत्ती, सातत्य आणि आलेल्या संकटाना समोर जा असा संदेश देत आपले मनोगत व्यक्त करून महामानवास त्यांच्या पावन स्मुर्तीस विनम्र अभिवादन करून सामूहिक श्रध्दांजली बहाल करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक मसुडकर यांनी केले तर आभारप्रदर्शन पशु व दुग्धशास्त्र विभाग  प्रा. के . एस. देशमुख यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.सदरील कार्यक्रमास  डॉ . पी जी.देव्हडे, प्रा.डी.टी.बोरकर एस आर राठोर  एस.एम.कापसे विकास जोगदंड, समवेत सर्व प्राध्यापक तथा इतर कर्मचारी वृंद व रा. से. यो. स्वयंमसेवक आदींची उपस्थिती लाभली.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीशेती क्षेत्र