Join us

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा; कृषी विभागाने २४५३ दावे निकाली काढले, पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 10:55 AM

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने २४५३ दावे निकाली काढले असून त्यापोटी ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने २४५३ दावे निकाली काढले असून त्यापोटी ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. राज्यात ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसांच्या खंडित कालावधीतील ७७ (७३ मृत्यू व ४ अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी १ कोटी ५१ लाख रुपयाचा विमा वितरित  करण्यात येणार आहे.

तसेच राज्यात २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीतील २३९ दिवसांच्या खंडित कालावधीतील पहिल्या टप्प्यातील २३९ (२३७ मृत्यू व २ अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी ४ कोटी ७६ लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यातील २,१३७ (२,०९४ मृत्यू व ४३ अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी ४२ कोटी ३६ लाख रुपये अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पात्र दाव्यांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांना आर्थिक मदतीची ४७ कोटी १२ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे.

अशा प्रकारे राज्यात ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ आणि २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीतील एकूण २,४५३ दावे  निकाली काढण्यात आले आहेत. त्यापोटी ४८ कोटी ६३  लाख रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीराज्य सरकारगोपीनाथ मुंडेसरकारी योजना