Join us

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा १६ हप्ता शेतकऱ्यांच्या खाती जमा, पैसे आले की नाही कसे तपासाल?

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 28, 2024 6:14 PM

पंतप्रधान माेदी यांनी यवतमाळमधून केली घोषणा, यानिमित्ताने केंद्र शासनाने उद्या संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता जमा झाला आहे. सुमारे ९ कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  पीएम किसान योजनेचे २ हजार व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे ४ हजार, असे एकूण ६ हजार रुपये आज बुधवारी राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. यानिमित्ताने केंद्र शासनाने उद्या संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळहून वितरित करण्यात आला. यासह विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत.

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना २००० रुपये असे एकूण ६००० रुपये प्रतिवर्ष मिळतात.ही रक्कम वार्षिक तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. एप्रिल जुलै, ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च या महिन्यांमध्ये ही रक्कम वितरित केली जाते.

तुमच्या खाती पैसे आले की नाही हे कसे तपासावे? जाणून घ्या.

  • पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला pmkisan.gov.in भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर लाभार्थी स्थिती या टॅबवर क्लिक करा
  • यामध्ये आधार क्रमांक, खाते क्रमांक व मोबाइल नंबर टाकावा लागेल.
  • निवडलेल्या पर्यायावर डेटा मिळवा या टॅबवर क्लिक करा
  • लाभार्थी डेटा पाहण्यास पात्र ठरतील

या हेल्पलाइन क्रमांकावर करा संपर्क

पीएम किसानविषयी कोणतीही अडचण असल्यास लाभार्थ्यांना पीएम किसान हेल्पलाईन नंबर 1555261 आणि 1800115526 किंवा 011-23381092 वर संपर्क साधावा.

तक्रार नोंदवण्यासाठी ...

पीएम किसानबाबत कोणतीही तक्रार असल्यास खाली दिलेल्या मेल आयडीवर तुम्हाला तक्रार करता येऊ शकते. ईमेल आयडी: pmkisan-ict@gov.in आणि pmkisan-funds@gov.inहेल्पलाइन क्रमांक: 011-24300606,155261टोल-फ्री क्रमांक: 1800-115-526 

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनानरेंद्र मोदीयवतमाळ