कोल्हापूर : राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज परतावा दिला जातो.
मागील २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख ४८ हजार शेतकऱ्यांना २६.९६ कोटी रुपये मिळाले असले तरी २०२२-२३ व २०२३-२४ या आर्थिक वर्षातील दोन लाख ३३ हजार २९७ शेतकऱ्यांचे ४६ कोटी २४ लाख रुपये अद्याप आलेले नाहीत.
पीक कर्जाची वेळेत परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने व्याज परतावा योजना आणली आहे.
केंद्र सरकार थेट बँकांकडे परतावा जमा करते. राज्य शासनाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ टक्के परतावा देते.
त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील निधी व राज्य शासन स्वतः निधी उपलब्ध करून देते. पीक कर्जाची उचल केल्यापासून ३६५ दिवसांत परतफेड करणारे शेतकरी या योजनेला पात्र ठरतात.
कोल्हापूर जिल्ह्यात वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे शासनाच्या कर्ज माफीपेक्षा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक होतो.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील मिळालेले परतावा११ कोटी ९९ लाख - जिल्हा नियोजन समितीकडून रक्कम मिळाली.१४ कोटी ९७ लाख - राज्य शासनाकडून रक्कम मिळाली.
प्रलंबित व्याज सवलतीची रक्कम
आर्थिक वर्ष | आर्थिक वर्ष | रक्कम |
२०२२-२३ | १,४३,१९१ | २८ कोटी ९३ लाख ४८ हजार |
२०२३-२४ | ९०,१०६ | १७ कोटी ३० लाख ६६ हजार |
अधिक वाचा: एक रुपयात पिक विमा बंद; आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना