गेल्या काही काळापासून बनावट आधार कार्डचा वापर करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच यूआयडीएआयने नागरिकांना बनावट आधार कार्डपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Fake Aadhar Card जाणून घेऊया बनावट आधार कार्ड नेमके कसे ओळखावे, यासाठीची मुद्देसुद माहिती...
यूआयडीएआयचा उद्देशडिजिटल स्वच्छता आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे.
आधार पडताळणीची अधिकृत पद्धत१) क्यूआर कोड स्कॅन करा.२) यासाठी mAadhaar अॅप वापरा (किंवा यूआयडीएआयच्या वेबसाइटवरील क्यूआर कोड स्कॅनर)३) स्कॅन केल्यावर ती माहिती कार्डवरील माहितीशी जुळते का, हे तपासा; जुळत नसेल, तर ते आधार कार्ड बनावट असण्याची शक्यता आहे.
बनावट आधार कार्ड कसे ओळखावे?◼️ निराळा फॉन्ट.◼️ छपाईतील चुका.◼️ क्यूआर कोड स्कॅन न होणे.◼️ चुकीचा आधार क्रमांक.◼️ संशयास्पद इमेज/पीडीएफ फाइल्स.
आधार पडताळणी का महत्त्वाची?◼️ बँक केवायसी.◼️ सरकारी योजनांच्या लाभासाठी.◼️ नोकरीसाठी ओळखपत्र.◼️ सिम कार्ड सक्रिय करण्यासाठी.
यूआयडीएआयने दिलेला इशारा◼️ व्हॉट्सअॅप/ईमेलवरील आधार कार्ड तपासणी न करता वापरू नका.◼️ फोटो, नाव किंवा क्रमांक पाहून फसू नका.◼️ फक्त क्यूआर कोडनेच आधार कार्डची खात्री होते.
अधिक वाचा: आता शेतजमिनीचे जुने दस्त डिजिटल स्वाक्षरीसहीत मिळणार ऑनलाईन; वाचा सविस्तर