Join us

बजेटच्या या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: February 1, 2024 11:27 IST

बजेटला झालीये सुरुवात, या शब्दांचे अर्थ समजून घेऊया..

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन आज ११ वाजता अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, महिला, नोकरदारांसाठी काय तरतूद असेल याकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे. दरम्यान, अर्थसंकल्प सादर होताना अनेक शब्द वारंवार वापरले जातात, जे आपल्या रोजच्या वापरात नसल्याने बजेट सादर होताना समजून घेण्यास अडचण येऊ शकते. चला जाणून घेऊया या शब्दांचे अर्थ..

आर्थिक वर्ष

जानेवारी ते डिसेंबर हा आपल्यासाठी वर्षभराचा कालावधी असतो. पण देशाचे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होऊन ३१ मार्चला संपते. आर्थिक वर्षातूनच भारत सरकार आणि भारतातील सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांचे व्यवसाय चालातात.

महसूली तूट

अर्थसंकल्पात महसूली तूट हा शब्द अनेकदा वापरला जातो. जेंव्हा सरकारचे उत्पन्न अंदाजापेक्षा कमी असते. त्याला महसूली तूट म्हणतात. महसूली तूट असेल तेंव्हा सरकारला अधिक कर्ज घ्यावे लागते.

आकस्मिक निधी

आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी हा निधी आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केला जातो. महागाई नियंत्रणासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार ज्यादा खर्चावर नियंत्रण ठेवते किंवा कर कमी करते.

महसूल खर्च

सरकारला देश चालवण्यासाठी लागणारा खर्च म्हणजे महसूली खर्च. कर्मचाऱ्यांचे पगार, वीज, पाणी आणि मंत्रालये आणि विभागांची बिलं भरणे, सबसिडी अशा खर्चांसाठी हा निधी असतो.

भांडवली खर्च

जमीन खरेदी, शाळा, महाविद्यालय, कोणतीही इमारत बांधण्यासाठी किंवा मालमत्ता निर्माण करण्यासाठी सरकार हा पैसा खर्च करतो.

टॅग्स :अर्थसंकल्प 2024शेती क्षेत्रनिर्मला सीतारामन