आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई-केवायसी मोहीम जोरात सुरू आहे. गाव, वाडी, शाळा, महाविद्यालयांत ही प्रक्रिया राबवली जात आहे.
लाभार्थी मोबाइलवरून आयुष्मान अॅपद्वारे स्वतः ई-केवायसी करू शकतात. या योजनेद्वारे पात्र कुटुंबांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ मिळतो.
५ लाखांपर्यंत मोफत उपचार◼️ आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना प्रतिवर्ष ५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळतात.◼️ यामध्ये हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचार, डायलिसिस, गुडघे-हिप रिप्लेसमेंट, मातृत्व सेवा, अपघाती शस्त्रक्रिया यांसारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे.◼️ रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन दिवसांचा आणि नंतर १५ दिवसांचा खर्चही कव्हर होतो.
इथे मिळेल मोफत सेवाआयुष्मान भारत योजनेंतर्गत रुग्णालयांत मोफत उपचार मिळतात, यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. यात कॅन्सर, हृदयविकार, न्यूरो सर्जरी, मातृत्व सेवा आणि अपघाती उपचारांचा समावेश आहे.
आयुष्मान कार्ड कुठे काढाल?आयुष्मान अॅप किंवा https://pmjay.gov.in वर लॉगिन करून पात्रता तपासा आणि ई-केवायसी पूर्ण करा. जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, महा-ई-सेवा केंद्र, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत किंवा स्वस्त धान्य दुकानात आधारकार्ड, रेशन कार्ड आणि मोबाइल क्रमांकासह भेट द्या.
मोबाइलवरून ई-केवायसी◼️ गुगल प्ले स्टोअरवरून 'आयुष्मान' अॅप डाऊनलोड करा.◼️ मोबाइल नंबर, कॅपचा कोड टाकून ओटीपीद्वारे लॉगिन करा.◼️ तुमचे नाव, रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून पात्रता तपासा.◼️ ई-केवायसी पूर्ण करा: आधार-आधारित ओटीपी पडताळणीद्वारे ई-केवायसी करा.◼️ मंजुरीनंतर आयुष्मान कार्ड https://beneficiary.nha.gov.in/ वरून डाउनलोड करा.
अधिक वाचा: रब्बी ज्वारीचे बियाणे अनुदानावर मिळणार; प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य