Join us

दिवाळीच्या तोंडावर सुक्या मेव्याची मागणी वाढली; कितीची होणार उलाढाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 15:00 IST

सुक्या मेव्याची वाढली आयात

सणासुदीला नातेवाइक तसेच आप्तेष्टांना भेटवस्तू देण्यात येतात. याशिवाय आणखी एक वस्तू आहे जी आवर्जून दिली जाते, ती म्हणजे सुका मेवा, काजू, बदाम, अंजीर इत्यादींनी भरलेली आकर्षक सजावट केलेल्या बॉक्समध्ये मिळालेला सुका मेवा पाहून सर्वजण आनंदी होतात. यावेळी सुका मेवा बाजारात चांगलाच भाव खाणार असून सुमारे १५ टक्क्यांपर्यंत विक्री वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये सुका मेव्याची बाजारपेठ थंडच होती. या वर्षी मात्र नवरात्रोत्सवानंतर सुका मेव्याला मागणी वाढू लागली आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर घाऊक स्वरुपात ऑर्डर विक्रेत्यांना मिळताना दिसत आहेत. सुका मेव्याची मागणी वाढल्यामुळे आयातही वाढली असून किमतीही गेल्या वर्षी एवढ्याच आहेत.

अशी झाली आयात

मागणी वाढली

कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना सुका मेवा भेट देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. दिवाळीपूर्वी सुका मेव्याच्या गिफ्ट पॅकेटची मागणी वाढू लागली आहे.

मोठी उलाढाल होणार

२५ हजार कोटींची उलाढाल सुका मेवा बाजारपेठेत होण्याची अपेक्षा आहे, अक्रोड, अंजीराची आयात वाढली आहे. काजूची आयात मात्र घटली आहे.

काय आहेत भाव?

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२२ - २३ या दोन वर्षांचे सुक्या मेव्याची उलाढाल अशी होती.

सुका मेवा२०२२२०२३
बदाम१,२८,१९२१,३५,७९६
काजू८,५७,९९१७,२७,२२३
किशमिश१३,८७३१५,८२२
अक्रोड११,६५१२३,३७६
अंजीर२,३९९४,३९४

 

टॅग्स :दिवाळी 2022