Join us

भूजल पातळीत घट, जालना जिल्ह्याला करावा लागणार तीव्र पाणीटंचाईचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:55 AM

डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ०.६९ मीटरने पाणी पातळी घसरली

जालना जिल्ह्याच्या भूजल पातळीत कमालीची घट झाल्याचे जानेवारीतील अहवालातून पुढे आले आहे. अजूनही तीन महिने उन्हाळा असून, यंदा एक महिना आधीच उष्णतेच्या लाटेला आरंभ झाला आहे. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणीपातळीत ०.६९ मीटरने घट झाली आहे.

भूजल विभागाकडून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर अशी चारवेळा पाणीपातळी तपासली जाते. भूजल विभागाकडून जिल्ह्यातील ११० विहिरी निश्चित केलेल्या आहेत. पाणीपातळीच्या नोंदी घेतल्यानंतर मागील पाच वर्षांच्या पातळीशी तुलना सरासरी काढली जाते. त्यावरून टंचाई तीव्रतेचा अंदाज बांधला जातो. जानेवारी २०२४ मध्ये घेतलेल्या नोंदीत जालना जिल्ह्याच्या पाणीपातळीत सरासरी ०.६९ मीटरने घट झाली आहे. जिल्हयातील एकाही तालुक्यात पाणीपातळीत वाढ झालेली नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे यावर्षी भूजलामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.यंदा थंडीचा कालावधीही कमी राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन, पाणी वेगाने जमिनीत मुरणे यासारखे प्रकार घडले आहेत. पावसावरच पाणी साठे अवलंबून असतात तसेच भूगर्भातील पाण्याचा उपसाही वाढला आहे.मार्चच्या सुरुवातीलाच अनेकांच्या विहिरीची पाणीपातळी कमी झाली आहे. नदी किनारी परिसरातील विहिरींचे पाणी अजूनही स्थिर आहे. यंदाच्या उन्हाळा तीव्र असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. दरम्यान, यावर्षी जानेवारी महिन्यात घेतलेल्या नोंदीमध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भूगर्भातील पाणी पातळी घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भूजल पातळीची स्थितीतालुका      भूजल पाणी पातळी (नोंदी मीटरमध्ये)

जालना ६.११बदनापूर ८.५५भोकरदन ६.९१जाफराबाद ५.७१परतूर ८.९०मंठा ७.१२ अंबड ८.०७घनसावंगी ८.०९

टॅग्स :पाणी टंचाईपोलीस अधीक्षक, जालना