Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा पीक अंदाज निश्चित; यंदा ४.५ लाख कापूस गाठी वाढीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:16 IST

पीक अंदाजानुसार मागील अंदाजाच्या ३०५.१७० लाख गाठींच्या तुलनेत ४.५ लाख गाठींची वाढ केली असून, हंगामासाठी १७० किलो वजनाच्या ३०९.५० लाख गाठी (अधिक-वजा ३ टक्के) असा नवीन अंदाज जाहीर केला आहे.

नवीन पीक अंदाजानुसार मागील अंदाजाच्या ३०५.१७० लाख गाठींच्या तुलनेत ४.५ लाख गाठींची वाढ केली असून, हंगामासाठी १७० किलो वजनाच्या ३०९.५० लाख गाठी (अधिक-वजा ३ टक्के) असा नवीन अंदाज जाहीर केला आहे.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीआयए) ने ५ डिसेंबर रोजी २०२५-२६ हंगामाचा नवीन पीक अंदाज आणि ताळेबंद निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित केली.

या बैठकीत सर्व राज्यांमधील १८ अखिल भारतीय सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या राज्यांबाबतचा अंदाज बैठकीत मांडला आहे. भारतामध्ये सध्या कापसाच्या ८२ लाख गाठी बाजारात उपलब्ध आहेत. यापैकी किमान २० लाख गाठी भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केल्या आहेत.

स्थानिक उत्पादन ३१० लाख गाठी अंदाजे राहण्याची शक्यता आहे, तर कापसाच्या ७५ लाख गाठींची आयात होण्याची चिन्हे दिसत आहेत. चांगल्या दर्जाचा कापूस मोठ्या प्रमाणात सीसीआयकडे जात असल्यामुळे कापसाच्या निर्यातीची संधी कमी असून, अंदाजे १६ लाख गाठी निर्यात होण्याची शक्यता आहे. राज्यनिहाय पीक अंदाजानुसार सर्वात जास्त महाराष्ट्रात ९१ लाख कापसाच्या गाठी वाढण्याची शक्यता आहे.

रुपयाच्या चढ-उताराचा भावावर होणार परिणाम

• तज्ज्ञांच्या मते, जर ओपनिंग स्टॉक ६० लाख गाठी आणि देशांतर्गत वापर ३२५ लाख गाठी गृहीत धरला, तर २०२५-२६ हंगामाच्या अखेरीस भारताचा क्लोजिंग स्टॉक अंदाजे १०५ लाख गाठी राहील.

• आंतरराष्ट्रीय बाजारावर बोलताना, आयसीई कापूस भाव ७० सेंट्सपर्यंत जाण्याची शक्यता कमी आहे, तर ६२ सेंट्सपर्यंत खाली येण्याची शक्यता अधिक आहे.

• तसेच, फेडचे आर्थिक निर्णय, अमेरिकेचे राजकीय वातावरण, भारतीय रुपयातील चढ-उतार यांचा भावावर परिणाम होणार आहे. रुपया जर अधिक कमजोर झाला तर आयात महाग होऊ शकते.

• कापसाच्या गुणवत्तेतील फरक आणि विविध आरडी मूल्यांमधील किंमत-तफावत ही बाजारातील अनिश्चितता वाढवणारी प्रमुख कारणे आहेत. विचारपूर्वक व्यवहार करणेच गिरण्यांसाठी हिताचे ठरेल, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

राज्यनिहाय पीक अंदाज (लाख गाठी, १७० किलो प्रत्येक)

उत्तर भारत 

राजस्थान - ९.००., उत्तर प्रदेश -  १२.५०., हरियाणा - ७.००., पंजाब - २.००., एकूण ३०.५० लाख गाठी. 

मध्य भारत 

गुजरात - ७५.००., महाराष्ट्र - ९१.०० ., एकूण १८५.०० लाख गाठी. 

दक्षिण भारत 

तेलंगणा - ४०.५०., आंध्र प्रदेश - १७.००., कर्नाटक - २६.००., तामिळनाडू - ४.५०., एकूण ८८.०० लाख गाठी. 

ओडिशा - ४.००इतर २,००

संपूर्ण भारतासाठी १७० किलो वजनाच्या ३०९.५० लाख गाठी (अधिक-वजा ३ टक्के) अशी नवीन गणना करण्यात आली आहे. म्हणजेच १६२ किलोंच्या ३२५ गाठी इतका अंदाज समोर आला आहे.

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton Association of India: Crop Estimate Up, 4.5 Lakh Bales Increase

Web Summary : Cotton Association of India forecasts a 4.5 lakh bale increase, totaling 309.50 lakh bales. Maharashtra anticipates the highest rise at 91 lakh bales. Closing stock is estimated at 105 lakh bales, influenced by rupee fluctuations and cotton quality.
टॅग्स :कापूसशेती क्षेत्रशेतीबाजार