Bogus Pik Vima : परभणी(prabhani) येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात आ. सुरेश धस(Suresh dhas) यांनी परळीतील बोगस(Bogus) शेतकरी परभणीतील शेतकऱ्यांची जमीन दाखवून पीकविमा(Pik Vima) भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप केला होता. याची शासनाने दखल घेतली आहे. ११ हजार शेतकऱ्यांनी २६ हजार हेक्टरचा बोगस विमा काढल्याचे १७ गावांत समोर आले आहे.
कृषी विभागाने बोगस शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याची आधीच दखल घेतली होती. असे शेतकरीही शोधले होते. मात्र, त्यावर पुढे करायचे काय? यावरून संभ्रम होता. त्याचा परिणाम म्हणून मागील तीन महिन्यांपासून केवळ कागदी खेळ खेळला जात होता. माध्यमांतून तगादा लागल्यानंतर शासनाकडे याचा अहवाल पाठविण्याची तयारी कृषी विभागाने केली होती.
मात्र, तरीही तो पाठविला नव्हता. आता शासनानेच हा अहवाल मागविला आहे. त्यामुळे कृषी विभागाने चार तालुक्यांतील १७ गावांत झालेल्या बनवेगिरीचा अहवाल शासनाला सादर केला आहे.
कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या काळात हा प्रकार वाढल्याकडे आ.धस यांनी अंगुलीनिर्देश केला होता. या प्रकाराचे सर्वाधिक लोण आ.धस यांनी म्हटल्याप्रमाणे सोनपेठ तालुक्यात दिसत आहे.
या एकाच तालुक्यातील आठ गावे बोगस विम्याच्या कचाट्यात सापडली आहेत. तर त्यानंतर जिंतूर तालुक्यावर अटॅक केला आहे. जिंतूर तालुक्यात सहा गावांतील शेतीवर बोगस शेतकऱ्यांनी बोगस पीकविमा भरला आहे. तर पालममधील दोन व गंगाखेडमधील एका गावाचा समावेश आहे.
भरला गावनिहाय पीकविमा
तालुका | गाव | शेतकरी | क्षेत्र हे. |
पालम | मोजमाबाद तां. | ३९७ | १०००.२५ |
पालम | रामापूर तां. | १३७५ | ३७८१.२५ |
सोनपेठ | सोनपेठ | ४७४ | १३७७.४४ |
सोनपेठ | सोनपेठ एम. | ८१२ | २३०६.८१ |
सोनपेठ | सखाराम तां. | ३४७ | ९१२.६८ |
सोनपेठ | भाऊचा तां. | १३०० | २९१२.२७ |
सोनपेठ | कोठाळा तां. | १७८ | ३९९.९५ |
सोनपेठ | रेवा तां. | २०९४ | ३६२५.३९ |
सोनपेठ | तुकाई तां. | २५५ | ५४६.३३ |
सोनपेठ | मुन्शीराम तां. | ४४० | १०९०.२९ |
गंगाखेड | आनंदनगर | २३९२ | ५२४८.९९ |
जिंतूर | आंगतगाव तां. | १८० | ४८३.३८ |
जिंतूर | केहाळ तां. | २४ | ६१.२२ |
जिंतूर | लिंबाळा | २४७ | ५५२.११ |
जिंतूर | पोखर्णी तां. | ३१३ | ८५५.५४ |
जिंतूर | सेवालालनगर | ३८ | १४५.१० |
जिंतूर | तेलवाडी | ३३० | ८३३.६० |
तांड्यांवरील शेती केली लक्ष्यबोगस पीक विमा भरतानावाडी, तांड्याच्या भागातील शेतीला लक्ष्य केल्याचा प्रकार समोर येताना दिसत आहे. जी नावे यादीत दिसत आहेत, त्यामध्ये तांड्यांचीच संख्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. नेमकी अशाच भागातील शेती लक्ष्य करण्यामागचे कारण कळायला मार्ग नाही.