आषाढी एकादशी झाल्यानंतर येणारा मुख्य व मुळाचा सण म्हणून ओळखला जाणारा बेंदूर हा सण शेतकऱ्यांच्या सर्जा-राज्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
ग्रामीण भागातील शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मातीचे बैल, बैलांसाठी झूल, कड्या, साज, हार, तुरे, रांगोळी आदी साहित्यांची भरभरून खरेदी करतात
प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे.
शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना धुले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते.
याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळीनंतर बैलांना खायला दिली जाते.
नवे झुल, कड्या, साज, हार, घुंगरु, काजळ, रंगीत कपडे, घंटा, मिरवणुकीसाठी ध्वज आदी वस्तूंची बेंदूर सणाला खरेदी होते व बैलांना सजविले जाते.
शहरी भागात मातीच्या बैलांचे पूजन केले जाते. त्यामुळे ठिकठिकाणी मातीच्या बैलजोड्या विक्रीस उपलब्ध झाल्या होत्या. सणामुळे सर्वच वस्तूंच्या दरात यंदा वाढ झाली आहे. मात्र नागरिकांचा खरेदीतील उत्साह कमी झाली नाही.
अधिक वाचा: Tukda Bandi Kayda : शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर