Join us
Daily Top 2Weekly Top 5

बी कीपिंग स्फूर्ती क्लस्टर अंतर्गत मधपालक बैठक संपन्न

By बिभिषण बागल | Updated: August 19, 2023 14:00 IST

अधिक मध उत्पादन वाढीसाठी मधमाशांचे स्थलांतर करणे. बी ब्रीडींग कार्यक्रम आणि पावसाळ्यात मध पेट्यांची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी महाबळेश्वर बी. कीपिंग स्फूर्ती क्लस्टर अंतर्गत मधपालक बैठक मध संचालनालय महाबळेश्वर येथे संपन्न झाली. मिरजकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, नारायणकर, श्री. बी. के. चव्हाण, पुरी CBRTI,KVIC पुणे, स्फूर्ती क्लस्टर समूहाचे सुमारे १०० मधपालक उपस्थित होते.

अधिक मध उत्पादन वाढीसाठी मधमाशांचे स्थलांतर करणे. बी ब्रीडींग कार्यक्रम आणि पावसाळ्यात मध पेट्यांची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विशेष हेतू वाहन SPV, नोंदणी करण्यासाठी दहा मधपाळांची निवड केली. मध केंद्र योजना अंतर्गत मध मधपेट्यांची मागणी नोंदविण्यात आली.

या कार्यक्रमात दिग्विजय पाटील, संचालक मध संचालनालय, महाबळेश्वर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मधपालकांच्यात मध संचालनालय महाबळेश्वर येथे भेट दिल्याने उत्साह निर्माण झाला, त्याचबरोबर सर्वांनी मध संचालनालय महाबळेश्वर बद्दल माहिती जाणून घेतली. 

टॅग्स :पीकशेतीशेतकरीमहाबळेश्वर गिरीस्थान