Join us

एका झाडाच्या विक्रीतून १.२५ कोटी रुपयांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2023 10:57 IST

केरळ वन विभागाने ऑनलाईन लिलावाद्वारे विक्रमी महसूल मिळवत केवळ एका झाडाच्या विक्रीतून १.२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले.

केरळ वन विभागाने या महिन्यात चंदनाच्या ऑनलाईन लिलावाद्वारे विक्रमी महसूल मिळवला. केवळ एका चंदनाच्या झाडाच्या विक्रीतून १.२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. केरळमधील प्रसिद्ध मरायूर चंदनाची झाडे त्यांच्या अनोख्या सुगंधासाठी ओळखली जातात.

विभागाला लिलावातून ३७.२२ कोटी रुपयांची कमाई झाली, यात अनेक मोठ्या कंपन्यांनी सहभाग घेतला. चंदनाचे उत्पन्न मालकांना दिले जाईल. मरायूरमधील एका खासगी जमीनमालकाकडून फक्त एक चंदनाचे झाड १.२५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. या झाडाची केवळ मुळे २७.३४ लाख रुपयांना विकली गेली.

टॅग्स :जंगलवनविभागकेरळ