Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विज्ञान केंद्र, मदनापुरमचे शेती उपयोगी साहित्य प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2023 13:01 IST

कृषी विज्ञान केंद्र, मदनापुरम पब्लिकेशनचे प्रकाशन

कृषी तंत्रज्ञान ऍप्लिकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट, हैदराबादने तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईम्बतूर येथे कृषी विज्ञान केंद्र वार्षिक क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

उद्घाटन सत्रादरम्यान कृषी विज्ञान केंद्र, मदनापुरम पब्लिकेशनचे प्रकाशन माननीय डॉ. उधमसिंह गौतम उपमहासंचालक (कृषी विस्तार) कृषी विस्तार विभाग, कृषी अनुसंधान भवन, नवी दिल्ली, माननीय डॉ. शेख मीरा संचालक कृषी तंत्रज्ञान ऍप्लिकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट, हैदराबाद, माननीय डॉ. गीतलक्ष्मी, कुलगुरू, तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईम्बतूर आणि इतर यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दादासाहेब खोगरे यांनी सांगितले की प्रकाशने शेतकरी, महिला आणि ग्रामीण युवकांसाठी उपयुक्त आहेत, त्यांनी प्रकाशनांचा लाभ घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :कृषी विज्ञान केंद्रपीकशेतकरीशेतीतेलंगणातामिळनाडू