Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agricultural Research : देशी कपाशीचा आधुनिक धागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 12:45 IST

Agricultural Research : 

Agricultural Research : 

राजरत्न सिरसाट : 

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या देशी कापसाचे 'पीडीकेव्ही धवल' वाण राष्ट्रीय स्तरावर धागा जोडणार आहे. त्याचबरोबर पीडीकेव्ही-सूरज हे सूर्यफुलाचे वाण, पीडीकेव्ही आरंभ मका आणि पीकेव्ही-राळा या नव्याने विकसित केलेले वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आले आहे.बदलत्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. हीच बाब ओळखून अकोल्याच्या डॉं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यासाठी वाणाची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.  १७० ते १८० दिवसात येणाऱ्या या वाणाचे हेक्टरी उत्पादन १५ ते १६ क्विंटल आहे. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि जैव-संवर्धनयुक्त १०९ वाणांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्यात आले. यावेळी पंतप्रधान शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

ही आहेत वाण अकोल्याच्या या देशी कापसाच्या वाणाचा समावेश आहे. तसेच पीडीकेव्ही-सूरज हे सूर्यफुलाचे वाण, पीडीकेव्ही आरंभ मका आणि पीकेव्ही-राळा या नव्याने विकसित केलेले वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आले आहे.  

टॅग्स :शेती क्षेत्रसंशोधन