Join us

पीएम किसान सन्मान निधीसोबत क्रेडिट कार्डही मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2023 2:55 PM

किसान क्रेडिट कार्ड मोहीम घरोघरी राबविली जाणार आहे. तसेच ही मोहीम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या तीन महिन्यांत किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच केली. या योजनेची सुरुवात झाली आहे. किसान क्रेडिट कार्ड मोहीम घरोघरी राबविली जाणार आहे. तसेच ही मोहीम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे.

या शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डही मिळणार- पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदरावर ३ लाख रुपये कर्ज देण्यात येते.- शेतकऱ्याने कर्जाची रक्कम वेळेवर भरली तर त्यामध्ये ३ टक्के सवलत दिली जाते.- ज्या शेतकऱ्यांकडे किसान कार्ड नाही त्यांना बँकामार्फत कार्ड देण्यात येणार आहेत.

३१ डिसेंबरपर्यंत अभियानया मोहिमेमुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या कृषी व्यवसायांना चालना देण्यासाठी पत सुविधा मिळणार आहे. ही मोहीम १ ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीपर्यंत सुरु राहील.

कोठे साधायचा संपर्क सर्व सरकारी, खासगी, सहकारी आणि स्थानिक बँका हे क्रेडिट कार्ड देऊ शकतात. तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर, म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन यासाठी अर्ज दाखल करू शकता.

प्रक्रिया सोपीकिसान सन्मान लाभार्थीना हे क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया सोपी आहे. यासाठी पिकाचा तपशील, ओळखपत्राची फोटो कॉपी (झेरॉक्स) आणि एकपानी अर्ज एवढे जमा करावे लागणार आहे.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाकेंद्र सरकारपीकनरेंद्र सिंह तोमरनिर्मला सीतारामनबँकशेतकरी