पुणे : यंदा आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे पण यावर्षी कोकणातील आंबा बाजारात येऊ लागला आहे. रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पण यावर्षी प्रेरकांच्या वापरामुळे कोकणातील आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, कोकणात बरेच आंबा उत्पादक शेतकरी कल्टार या प्रेरकाचा वापर करतात. कल्टारच्या वापरामुळे आंब्याला लवकर मोहर येतो, परंतु हा वापर आंबा उत्पादनासाठी भविष्यात धोकादायक ठरतो. यावर्षी कोकणातील केवळ २५ टक्के झाडांना मोहर आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकळ यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, कल्टार हे एक हार्मोन असून अनेक शेतकऱ्यांनी ऑक्टोबर मध्ये आंब्याला मोहर येण्यासाठी याचा वापर केला तर ऑक्टोबर मध्ये मोहर आलेले आंबे फेब्रुवारी मध्ये बाजारात आले. बाजारात लवकर येणाऱ्या आंब्याला चांगला दर मिळतो. यामुळे आंब्याला लवकर मोहोर येण्यासाठी कल्टारचा वापर केला जातो. या वापरामुळे यंदा तब्बल ७५% आंब्याला मोहर आला नाही असाही दावा मोकळ यांनी केला आहे.मराठवाड्यातील केशर बाजारातजसा कोकणात हापूस प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातील केशर आंबासुद्धा आता बाजारात येऊ लागला आहे. तर येणाऱ्या काळात आंब्याची आवक वाढणार असल्याची शक्यता आहे. सध्या हापूसच्या एका डझनचे बाजारदर हे ८०० ते १२०० रूपयांच्या आसपास आहेत. त्या तुलनेत केशर आंब्याचे दर कमी आहेत.यंदा आंब्याची परिस्थिती चांगली नसून शेतकऱ्यांना आंबा लवकर बाजारात यावा म्हणून कल्टारचा वापर केलाय. तर केवळ २५ टक्के आंब्याला मोहर आला असून तेच आंबे सध्या बाजारात आले आहेत. कोकणातील बरेच शेतकरी या हार्मोनचा वापर करतात पण त्याचे दुष्परिणाम नंतर दिसून येतात.- चंद्रकांत मोकळ (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ)