Join us

जागतिक बँक अर्थसाहित स्मार्ट प्रकल्पासाठी १२० मास्टर ट्रेनर तयार होणार

By बिभिषण बागल | Published: August 12, 2023 10:37 PM

जागतिक बँक अर्थसाहित स्मार्ट प्रकल्पाचा बिझनेस डेव्हलपमेंट व मार्केटिंग बाबत एआयसी एडीटी बारामती फौंडेशन या इनक्युबेशन सेंटर समवेत करार

जागतिक बँक अर्थसाहित मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचा बिझनेस डेव्हलपमेंट व मार्केटिंग इनक्युबेशन बाबत अटल इनक्युबेशन सेंटर अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या समवेत दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी करार झाला.

सदर करारावर स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक मा.श्री कौस्तुभ दिवेगावकर (भा.प्र.से) व ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे यांचे उपस्थितीत श्री. ज्ञानेश्वर बोटे, अतिरिक्त प्रकल्प संचालक स्मार्ट व एआयसी एडीटी बारामती फौंडेशन चे संचालक श्री. विष्णू आत्माराम हिंगणे यांच्या सह्या झाल्या. या करारा अंतर्गत प्रकल्पातील अधिकारी व तज्ञांना प्रशिक्षकांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्या अंतर्गत १२० मास्टर ट्रेनर तयार होणार आहेत. हे मास्टर ट्रेनर स्मार्ट प्रकल्पातील समुदाय आदर संस्थांना ट्रेनिंग देणार आहेत.

या प्रशिक्षणात कडधान्य, तृणधान्य, फळे भाजीपाला आणि तेलवर्गीय बियांच्या व्यवसाय विकास आणि विपणन मुल्यसाखळी संदर्भात कौशल्याधीष्टीत प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, डॉ शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती आणि अटल इनक्युबेशन सेंटर मधील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कसा राबविता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी या करार मधुन निश्चितच उत्तम शेती उत्पादन, विपणन, मूल्यवर्धित साखळी निर्माण होईल असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी श्री. कौस्तुभ दिवेगावकर (भा.प्र.से) - प्रकल्प संचालक, स्मार्ट, श्री. ज्ञानेश्वर बोटे - अतिरिक्त प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे, श्री. जीवन बुंदे - समन्वयक, स्मार्ट, श्री. अरुण कांबळे - एसएओ क्षमता बांधणी, स्मार्ट पुणे, श्री. कुलदीप जाधव - कृषी व्यवसाय मूल्य साखळी तज्ञ, श्रीमती प्रतिभा कुताळ - तांत्रिक अधिकारी तसेच अटल इनक्युबेशन सेंटर तर्फे संचालक श्री. विष्णू आत्माराम हिंगणे - संचालक, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे आणि अटल इनक्युबेशन सेंटरच्या इन्क्युबेशन मॅनेजर सोनाली सस्ते हे सर्वजण उपस्थित होते. 

टॅग्स :शेतीशेतकरीसरकारबाळासाहेब ठाकरेबारामतीवर्ल्ड बँक