Kadaknath Kombdi : कुक्कुटपालन (Kukkutpalan) कारण्यासाठी कोणत्या कोंबड्यांची निवड करणे अपेक्षित असते. शिवाय कोणत्या कोंबडीची जात फायदेशीर ठरते. हे आपण यापूर्वी पाहिले आहे. या भागातून कडकनाथ कोंबडीविषयी (Kadaknath Kombadi) माहिती घेऊयात. ही कोंबडीची जात सर्वपरिचित असून एका प्रकरणामुळे देखील चर्चेत आलेली आहे.
कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये
- कडकनाथ कोंबडी ही प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ व धार जिल्ह्यात आढळते.
- कडकनाथ कोंबडीला आदिवासी लोक कालामासी (Kalamasi) असे सुद्धा म्हणतात.
- शरीराचा रंग हा काळा असतो.
- लैंगिक परिपक्वता ही २५ ते २६ आठवडे या वयामध्ये येत असते.
- अंड्यांचे वजन हे ४९ ग्रॅम असते. (४० आठवडे वयामध्ये)
- अंडी उबवणुकीतील सफल प्रमाण हे ७४ टक्के इतके आहे.
- तसेच अंडी उत्पादन हे वार्षिक १०५ अंड्यापर्यंत असते.
- अंड्यांचा रंग हा गर्द तपकिरी असतो.
- पक्षांचे वय 900 ग्रॅम (20 आठवडे वय)
मासांची गुणवत्ता :
- १) प्रथिनांचे प्रमाण 25% पेक्षा अधिक
- २) स्निग्ध पदार्थ 0.73 - 1.05 % पेक्षा कमी
- ३) हृदय रोगासाठी मांस उपयुक्त
- ४) 18 अमिनो आम्ले आणि संप्रेरकांनी युक्त,
- ५) कोलेस्टीरोल कमी
- संदीप नेरकर, विषय विशेषज्ञ पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव