Join us

Fish and Poultry Feed Business : असा सुरु करा मासे आणि पोल्ट्री फीड व्यवसाय, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:00 IST

Fish and Poultry Feed Business : मत्स्य व कुक्कुट खाद्य उत्पादन (Fish Farming) व्यवसाय केल्यास शेतकरी आणि उद्योजकांसाठी हा व्यवसाय अर्थार्जनासाठी चांगला मार्ग आहे.

Fish and Poultry Feed Business : भारतात मासे आणि पोल्ट्री फीड उत्पादन (Fish and Poultry Feed Business) व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. उच्च दर्जाच्या खाद्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात खाद्य उत्पादन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर पर्याय असू शकतो.  

योग्य नियोजन आणि दर्जाच्या आधारे मत्स्य व कुक्कुट खाद्य उत्पादन (Fish Farming) व्यवसाय केल्यास शेतकरी आणि उद्योजकांसाठी हा व्यवसाय अर्थार्जनासाठी चांगला मार्ग आहे. आजच्या लेखातुन मासे आणि पोल्ट्री फीड उत्पादन व्यवसायाशी (Poultry Farming) संबंधित माहिती जाणून घेऊया.

व्यवसाय सुरु करण्यापूर्वी हे मुद्दे लक्षात घ्या... 

मत्स्यव्यवसाय : भारतात मत्स्यव्यवसाय झपाट्याने विकसित होत आहे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे मत्स्य खाद्य आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या माशांची वाढ चांगली होईल.कुक्कुटपालन : कुक्कुटपालनामध्ये उच्च दर्जाच्या खाद्याची मागणी देखील जास्त आहे. पोल्ट्री फीडमध्ये पोषक तत्वांचा समतोल राखणे आवश्यक आहे.

व्यवसाय कसा सुरू करायचा? 

१. नियोजन तयार करा कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करायचे (मासे किंवा पोल्ट्री)?स्थानिक बाजारपेठेतील मागणी आणि शक्यतांचा अभ्यास करा.किती पैशांची गुंतवणूक करावी लागेल? याचा अंदाज लावा.

२. जागेची निवड आणि साहित्य व्यवसायासाठी बाजाराच्या जवळ असलेले ठिकाण निवडा.खाद्य तयार करण्यासाठी कच्चा माल, मिक्सिंग मशीन, ग्राइंडर आणि पॅकिंग मशीन यासारखी आवश्यक मशिनरी खरेदी करा. ३. कच्चा माल माशांच्या आहारासाठी : माशांना प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, चरबी आणि माशांचे पीठ, सोयाबीन, मका इत्यादीसारख्या खनिज समृध्द घटकांची आवश्यकता असते.पोल्ट्री फीडसाठी : मका, सोयाबीन, तांदळाचा भुसा इत्यादी. 

४. व्यवसाय परवाने घ्या स्थानिक कृषी विभागाकडून आवश्यक परवाने मिळवा.अन्न सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करा.

५. फीड बनवण्याची प्रक्रियासाहित्य निवड : दर्जेदार साहित्य निवडा.पॅकिंग : फीडला हवाबंद पिशवीत पॅक करा, जेणेकरून त्याची कार्यक्षमता टिकून राहील. 

६. विपणन आणि विक्रीशेतकऱ्यांशी संपर्क साधा : मासे आणि पोल्ट्रीफार्म मालकांशी थेट संपर्क साधा.ऑनलाइन विक्री : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुमची फीड विक्री करा.स्थानिक बाजारपेठ : कृषी मेळावे आणि स्थानिक दुकानांमध्ये उत्पादनाची जाहिरात करा. 

 

Winter Fish Farming : हिवाळ्यात मत्स्यपालनासाठी 'या' सात टिप्स नक्की वापरा, जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :पोल्ट्रीमच्छीमारशेती क्षेत्रशेतीव्यवसाय