Join us

Agriculture News : मच्छिमार बांधवासाठी महत्वपूर्ण निर्णय, मत्स्यबीज संचयन, उत्पादन, संवर्धन होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 16:52 IST

Agriculture News : महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

Agriculture News : मच्छिमार बांधवासाठी (Fisherman) महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. मच्छिमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत (Cabinet Meeting)  यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. या महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. मत्स्यबीज संचयन, पिजंरा पध्दतीने मत्स्यसंचयन, मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यबोटुकली संवर्धन इत्यादी महाराष्ट्रातील सागरी तसेच भूजल मच्छीमारांची नोंदणी, परवाना वितरण, परवाना तपासणी, नुतनीकरण, निरीक्षण इत्यादी कामे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात येतात. त्याअनुषगांने शासनाकडून मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कल्याणकारी मंडळाची रचनाया समितीत मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री अध्यक्ष असतील, राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील, तर विभागाचे सचिव सदस्य, तर आयुक्त सदस्य, उपसचिव सदस्य, तर प्रत्येक महसूल विभागातील एक नोंदणीकृत भूजल मच्छिमार संस्था यांचा प्रतिनिधी असे एकूण सहा सदस्य अशासकीय सदस्य म्हणून असतील. तर सह आयुक्त मत्स्य व्यवसाय हे सदस्य सचिव असतील.

महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची उदिष्टे व कार्य -

  • भूजलाशयीन क्षेत्रातील मच्छीमार बांधवाचे जीवनमान उंचावणे.
  • परंपरागत मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांचे हिताचे जतन करणे.
  • भूजलाशयीन क्षेत्रात काम करण्याऱ्या मच्छीमारांना बांधवाच्या व त्याच्या कुटुंबियांच्या आरोग्य व शिक्षण विषयक बाबीवर उपाययोजना करणे.
  • भूजलाशयीन क्षेत्रात काम करण्याऱ्या मच्छीमारांना रोजगारांच्या संधी निर्माण करणे.
  • मासेमारी उत्पन्न, विपणन, त्यावरील प्रक्रिया उद्योग याबाबतीत शासनास उपाय सूचविणे. 
  • मासे सुकविणे, मासे वाळविणे, विक्री तसेच मासे टिकून रहावे, यासाठी उपाय सूचविणे.

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमच्छीमार