Fish Farming :हिंगोली जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र (Krushi Vidnyan kendra Tondapur), तोंडापूर यांच्यामार्फत मत्स्यपालन विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मत्स्यपालकांसाठी सुवर्णसंधी आहे. तुमच्याकडे जर शेततळे असेल आणि मत्स्यपालन करायचे असेल तर या केंद्राकडून शुद्ध बीज तुम्हाला मिळणार आहेत.
कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या माध्यमातून मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्राने नुकतेच रोहू, कतला, मृगळ या माशांच्या जवळपास 1 क्विंटल मातृमाशांवर प्रयोग करत ५० लक्ष अंडी उत्पादन मिळाले आहे. या अंड्यांचे ३ दिवसांत अंडी जिरा (स्पॉन) मध्ये रूपांतर होईल. तर पुढील ३-४ महिन्यांत बोटकुली (फिंगरलिंग) तयार होतील.
आपल्याकडे शेततळे किंवा तलाव आहे का?
- दर्जेदार बोटकुली
- वैज्ञानिक पद्धतीने तयार
- उच्च जगण्याची क्षमता
- जलद वाढीची खात्री
- चांगले उत्पादन
माशांच्या मुख्य जाती:
- रोहू (Rohu) - जलद वाढीची
- कतला (Catla) - मोठ्या आकाराची
- मृगळ (Mrigal) - बाजारात मागणी
विशेषता:
- शुद्ध जातीचे बीज
- रोगप्रतिकारक शक्ती
- स्थानिक हवामानासाठी योग्य
- व्यावसायिक मत्स्यपालनासाठी उत्तम
मत्स्यपालन नियोजन सेवा:संपूर्ण मार्गदर्शन:तलाव तयारीमिश्र मत्स्यपालनआहार व्यवस्थापनआरोग्य व्यवस्थापन
मत्स्यपालनाचे फायदे:कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्नवर्षभर चालणारा व्यवसाय बाजारात चांगली मागणीपारंपरिक शेतीबरोबर अतिरिक्त उत्पन्न
- कृषी विज्ञान केंद्र, मत्स्यपालन विभाग, तोंडापूर, हिंगोली