Join us

Goat Farming Guide : शेळी प्रजननाचे नियोजन करण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:46 IST

Goat Farming Guide : शेळी प्रजननाचे (Sheli Palan) नियोजन करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते,  आजच्या लेखातून समजून घेऊयात... 

Goat Farming Guide :  शेळीपालन (Sheli Palan) व्यवसाय योग्य नियोजन केल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकतो. शिवाय शेळीपालनातील बारीक सारीक गोष्टींवर विशेष लक्ष दिल्यास व्यवसाय पुढे जाण्यास मदत होते. यातील महत्वाचा घटक म्हणजे असा कि, शेळी प्रजननाचे  नियोजन करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते,  आजच्या लेखातून समजून घेऊयात... 

अ. ऋतु चक्र

  • दोन ऋतुमध्ये सरासरी अंतर १८ ते २२ दिवस असते.
  • शेळ्यांच्या माज १६ ते १८ तास टिकून राहतो.
  • माजाच्या शेवटच्या काळात किंवा माज दाखविण्यापासून १२ तासांनंतर नैसर्गिक / कृत्रिम पद्धतीने शेळी भरवावी.

 

ब. शेळ्यामधील माजाची लक्षणे :

  • शेळ्या अस्थिर, अस्वस्थ, बेचैन राहतात. सारख्या ओरडत असतात.
  • शेळ्या नराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात.
  • शेळ्यांची भुक मंदावते, खाण्याकडे/चरण्याकडे लक्ष नसते.
  • शेपटीची वारंवार आडवी हालचाल करते.
  • माजावर आलेल्या शेळयांचा योनीमार्ग सुजून लाल होतो आणि योनीमार्गातुन चिकट स्त्राव खवतो.
  • शेळी दुध देत असल्यास त्याचे प्रमाण कमी होते.

 

प्रजनन हंगाम

मार्च, एप्रिल, मे उन्हाळी हंगाम माजावर येण्याचे आणि प्रमाणाची टक्केवारी ही 10 टक्के असते, तर नोव्हेंबर-फेब्रुवारी या हिवाळी हंगामात प्रमाणाची टक्केवारी 20 असते तर जून ऑक्टोंबर या पावसाळी हंगामात माजावर येण्याची आणि विताचे प्रमाण अशी टक्केवारी 70 टक्के असते.

- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ