Join us

टंचाईची दाहकता वाढली; चाऱ्यासाठी होतेय धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 9:14 AM

वाढते ऊन, तसेच पाण्याची कमतरता यामुळे ग्रामीण भागात हिरवा चारा संपत आला आहे. तसेच सध्या नवीन ज्वारी काढणी न ...

वाढते ऊन, तसेच पाण्याची कमतरता यामुळे ग्रामीण भागात हिरवा चारा संपत आला आहे. तसेच सध्या नवीन ज्वारी काढणी न झाल्यामुळे नवा कडबा बाजारात उपलब्ध होत नाही. त्यामुळे कडब्याला बाजारात शेकडा पाच हजारांपर्यंत भाव मिळत आहे.

उसाचा हंगाम सुरू असला की, वाढे विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दूध व्यवसाय करणारे पशुपालक, शेतकरी जनावरांना ओला चारा म्हणून वाढे विकत घेतात. आता उसाचा हंगामही कमी झाला असून, वाढे विक्रीस येणे बंद झाले आहे. त्यामुळे पशुपालकांना ज्वारीच्या कडब्याचा आधार घ्यावा लागतो. 

यावर्षी ज्वारीचे क्षेत्र कमी आहे.

रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी न झाल्यामुळे बाजारात चारा उपलब्ध नाही. जनावरांची संख्या अधिक असलेले कडब्याची गंजी घालून ठेवत आहेत. कडब्याला सध्या चार ते साडेचार हजार रुपये शेकडा भाव मिळत आहे. दररोज चार ते हजार कडबा विक्रीसाठी येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, दुधाचा व्यवसाय करणारे शहरातील पशुपालक पावसाळ्यापूर्वी कडबा खरेदी करून ठेवण्यास प्राधान्य देतात. येणाऱ्या महिन्यात कडब्याचे शेकडा भाव आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे पशुपालकांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास नियमावली जाहीर केली आहे.

टॅग्स :पाणी टंचाईचारा घोटाळाशेती क्षेत्र