Join us

Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:53 IST

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा मूळ मंत्र आज महिला बचतगटाच्या माध्यमातून सार्थकी ठरत आहे.

यमन पुलाटेबाभळेश्वर : एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा मूळ मंत्र आज महिला बचतगटाच्या माध्यमातून सार्थकी ठरत आहे.

जनसेवा फाउंडेशन लोणीच्या माध्यमातून सुरू झालेल्या बचतगटाच्या चळवळीतून लोणी खुर्द येथील विजया नामदेव शिंदे यांनी आपल्या छंदातून आगळावेगळा व्यवसाय सुरू केला आणि या माध्यमातून त्यांना मोठी कमाई होत आहे.

यातून त्यांनी सोबतच्या महिलांना रोजगारही दिला आहे. विजयाताईनी भाजीपाल्यापासून तयार केलेले विविध पापड, लोणची आणि विशेषतः कढीपत्त्याची चटणी फेमस झाली आहे.

महिला सक्षम झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून जनसेवा फाउंडेशनची स्थापना झाली. या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जवळपास ५० ते ६० हजार महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून संघटन झाले.

विजया नामदेव शिंदे यांनी भालचंद्र महिला बचतगट लोणी खुर्द या नावाने सुरू केला. विजयाताई या पहिल्यापासूनच विविध प्रकारची पापड लोणची चटण्या हे करण्यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा होता.

हाच व्यवसाय पुढे न्यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रथमच लोणी या ठिकाणी म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त होणाऱ्या स्वयंसिद्ध यात्रा २००२ मध्ये आपला स्टॉल लावला.

या स्टॉलमध्ये त्यांनी विविध प्रकारची पापड त्याचबरोबर टोमॅटो, पालक मेथी, बटाटा, मूग, उडीद, मका, तांदूळ आदींपासून तयार केलेली पापड आणि विविध प्रकारच्या चटण्या आणि शेवग्याची फुले आणि पानांची चटणी विक्रीसाठी ठेवली.

लखपती दीदीशिंदे यांना शेतकरी मेळाव्यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये लखपती दीदी हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.

माझ्या परिवाराला लोणची, पापड आवडतात. यातून प्रेरणा घेत मी गृहिणी ते उद्योजक होऊ शकते. हा आत्मविश्वास केवळ बचतगटामुळे मिळाला. - विजया शिंदे

अधिक वाचा: Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर

टॅग्स :महिलाशेतीकाढणी पश्चात तंत्रज्ञानव्यवसायअन्नशिवराज सिंह चौहान