Join us

साठवणूकीत गूळ खराब होवू नये म्हणून कसे करावे ऊस पिक व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 2:33 PM

गुळाची मागणी वर्षभर असल्याने उत्पादित गुळापैकी ५० ते ६० टक्के गुळाची मोठ्या कालावधीकरिता साठवण करावी लागते.

गुळाची मागणी वर्षभर असल्याने उत्पादित गुळापैकी ५० ते ६० टक्के गुळाची मोठ्या कालावधीकरिता साठवण करावी लागते. पावसाळ्यातील ४ महिने गुळ साठवणुकीच्या द्दष्टीने सर्वात कठीण काळ असतो.

गुळातील ग्लुकोज, फ्रुक्टोज तसेच सोडियम क्षार हवेतील आर्द्रता आणि तापमानामुळे सूक्ष्म जिवाणूची गुळावर वाढ होते. साखरेचे विघटन होऊन ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि हवेतील ओलवा अधिक प्रमाणात शोषला जातो. गूळ आम्लरुपी बनतो. त्यावर बुरशी वाढते आणि गूळ खराब होतो.

त्याचबरोबर गुळ खराब होण्यासाठी ऊस पिक व्यवस्थापन करताना होणऱ्या चुका तितक्याच कारणीभूत असतात. तर साठवणूकीत गूळ खराब होवू नये म्हणून ऊस पिक व्यवस्थापन कसे करावे ते पाहूया.

साठवणूकीत गूळ खराब होवू नये यासाठी घ्यावायाची काळजी१) आम्ल चोपण खारवट जमिनीतील ऊसापासून तयार केलेला गूळ साठवणूकीसाठी वापरू नये.२) गूळ उशिरा करण्यासाठी लवकर व मध्यम पक्क होणाऱ्या जातीच लावाव्यात कारण उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीपासून तयार केलेल्या गूळात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते३) भरणीनंतर रासायानिक खते देऊ नयेत.४) खोडवा ऊसापासून गूळ तयार केल्यास साठावणूकीमध्ये गूळ चांगला राहतो.५) जानेवारी ते मार्च या कालावधीत तयार केलेला गूळ साठवणूकीमध्ये चांगला टिकतो.६) ऊस तोडणीनंतर ऊसाचे गाळप ६ ते १२ तासाच्या आतच करावे रस काढल्यानंतर लवकरात लवकर गूळ तयार करावा.७) अपक्क जास्त वयाचा, लोळलेला किड/रोगग्रस्त पांगशा/पानशा तुटलेल्या ऊसापासून तयार केलेला गूळ साठवणूकीसाठी ठेवू नये.८) गूळ प्रकिया करताना रसामध्ये घाण जाऊ नये म्हणून स्वच्छता ठेवावी रस मंदान तसेच टाकीवर झाकण ठेवावे.९) गूळ प्रक्रियेमध्ये रसातील घाण, कचरा, राखेचे कण किंवा मळीचे कण व्यवस्थित काढवेत.१०) गूळ तयार करताना अनावश्यक रसायनाचा वापर टाळवा.

अधिक वाचा: एकरी १५० टन उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे अमोलने घातली कृषिभूषण पुरस्काराला गवसणी

टॅग्स :ऊसपीक व्यवस्थापनपीकशेतीकाढणी पश्चात तंत्रज्ञान