"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 04:31 PM2024-05-17T16:31:55+5:302024-05-17T16:37:18+5:30

Lok Sabha Election 2024 : या प्रचारादम्यान ब्रिजभूषण शरण सिंह यांनी स्वतःची तुलना एका सुटलेल्या वळूशी केली आहे. 

brij bhushan sharan singh said now i am free bull lok sabha election 2024 kaisarganj karan bhushan | "मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कैसरगंज : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुलगा करण भूषण निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलाच्या प्रचारात ब्रिजभूषण शरण सिंह व्यस्त आहेत. या प्रचारादम्यान ब्रिजभूषण शरण सिंह यांनी स्वतःची तुलना एका सुटलेल्या वळूशी केली आहे. 

शुक्रवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी, "मी निवृत्त झालो नाही किंवा म्हातारा झालो नाही. आता मी एक सुटलेला वळू आहे. आता मी जनतेसाठी कोणाशीही लढू शकतो", असे ब्रजभूषण शरण सिंह म्हणाले. दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या या वक्तव्याबाबत लोकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.

रॅलीत खचाखच भरलेल्या मंचावरून ब्रिजभूषण शरण सिंह हे स्थानिक भाषेत म्हणाले, "का करिहये हमार, का करिहये, लडे़ जितिहैं न, और हमसे ज्यादा मनइयों कोही के पास नाही हैं. जरूरत पड़ेगी तो आपके लिए लड़ाई लड़ूंगा. इन सारी समस्याओं को देख रहा हूं, तो हम चुप बैठने वाले नहीं हैं, आपको डबल सांसद मिलेगा-डबल सांसद."

पुढे ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, "मी वचन देतो की, मी म्हातारा झालो नाही आणि निवृत्तही होणार नाही. आता मी सुटलेला वळू झालो आहे, आता मी तुझ्यासाठी कोणाशीही लढू शकतो. मी पूर्वी तुमच्याबरोबर होतो, त्यापेक्षा दुप्पट आता तुमच्याबरोबर असणार आहे. मी तुमच्या सुख-दु:खात सहभागी होऊन दुप्पट ताकदीने काम करीन." दरम्यान, भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुलाला तिकीट दिले आहे.

Web Title: brij bhushan sharan singh said now i am free bull lok sabha election 2024 kaisarganj karan bhushan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.