राज यांच्या भाषणाच्या निमित्ताने शिव आणि मनसैनिक एकत्र : नरेश म्हस्के

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 12, 2024 06:35 PM2024-05-12T18:35:18+5:302024-05-12T18:35:48+5:30

नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

Shiva and Mansainik together on the occasion of raj thackeray's speech says Naresh Mhaske | राज यांच्या भाषणाच्या निमित्ताने शिव आणि मनसैनिक एकत्र : नरेश म्हस्के

राज यांच्या भाषणाच्या निमित्ताने शिव आणि मनसैनिक एकत्र : नरेश म्हस्के

ठाणे : राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचे अतिशय घनिष्ट संबंध होते. मी स्वतः राज ठाकरे यांना विद्यार्थी सेनेमध्ये असल्यापासून ओळखतो. आज आपण जर पाहिलं तर राज ठाकरे अनेक वर्षांनी ठाण्यात येत आहेत त्यामुळे इथे उत्साहाचे आणि भावनिक वातावरण तयार झालं आहे, असं महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी सांगितले. 

तसेच आनंद दिघे स्वतः मला राज ठाकरेंना सोडायला देखील सांगत. आम्ही एकत्र मेळावे, सभा देखील केल्या आहेत. त्यांनी यांनी मला हात धरून शिकवलेलं आहे. त्यामुळे आज राज ठाकरे येतायत याचा मला आनंद होतोय. बाळासाहेबांचे विचार राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही पुढे घेऊन जात आहेत त्यामुळे आज मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र दिसून येत आहेत, असे म्हस्के यांनी आणखी सांगितले. 

Web Title: Shiva and Mansainik together on the occasion of raj thackeray's speech says Naresh Mhaske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.