Next

‘मास्टर ब्लास्टर’च्या कन्येला लग्नासाठी फोनवरून वारंवार धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 12:54 PM2018-01-08T12:54:14+5:302018-01-08T12:54:47+5:30

 ‘मास्टर ब्लॉस्टर’ सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालत, नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणा-या पश्चिम बंगालमधील ...

 ‘मास्टर ब्लॉस्टर’ सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालत, नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणा-या पश्चिम बंगालमधील एका तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. देवकुमार मेट्टी (३२) असे त्याचे नाव असून, रविवारी त्याला वांद्रेतून मुंबईत आणण्यात आले.