काय आहे स्लम टुरिझ्म? ताजमहलपेक्षा जास्त कमाई करते धारावी; आकडा ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:18 AM2023-07-26T10:18:25+5:302023-07-26T10:27:14+5:30

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचं रुप बदलण्याची जबाबदारी अदानी ग्रुपला मिळाली आहे. विरोधी पक्षाने यावर नाराजी व्यक्त करत अदानी ग्रुपकडून हे प्रोजेक्ट हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे झोपडपट्टी असूनही धारावी पर्यटकांचे आकर्षण आहे. याठिकाणी हजारो परदेशी पर्यटक गरिबी बघण्यासाठी येतात.

तुम्ही-आम्ही जर बाहेर फिरण्याचं प्लॅनिंग करत असू तर बहुतांश लोकांच्या यादीत देशातील अथवा परदेशातील ठिकाणे असतील. ज्याठिकाणी बर्फाचा डोंगर, ऐतिहासिक ठिकाणे असतील. परंतु स्लम टुरिझ्म हादेखील अनेकांच्या पर्यटनाचा विषय आहे. ज्यात पर्यटक झोपडपट्टीचा फेरफटका मारतात. गरीब आफ्रिकन देशातून याची सुरुवात झाली जी भारतापर्यंत येऊन पोहचली आहे. आता ताजमहल पाहायला आलेला परदेशी पर्यटक मुंबईत धारावीतही फिरायला येतो.

१८ व्या शतकात मच्छिमारांचा एक समुदाय स्वस्त ठिकाणांच्या शोधात असताना याठिकाणी येऊन वसला. बाजूलाच माहिमची खाडी होती. ज्यावर मच्छिमारांचे पोट भरत होते. ही इंग्रजांच्या पहिल्याच्या मुंबई होती. हळूहळू पाणी कमी होत गेले आणि मच्छिमारांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यानंतर याठिकाणाहून मच्छिमार विखुरला आणि इतर गरीब लोक इथं येऊन राहू लागली.

धारावीत चमड्याचे उत्पादन, मातीची भांडी, कपडे यासारखे काम करणारे मजूर राहू लागले. २० व्या शतकात धारावीचा चेहरा बदलला. त्याठिकाणी शाळा, धार्मिक संस्था, हॉस्पिटल सर्व काही विकसित झाले. आता धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी बनली आहे.

जवळपास ५५० एकरमध्ये पसरलेली धारावीची झोपडपट्टी पाहिली तर आता इथं पाऊल ठेवायलाही जमीन उरली नाही. एका झोपडीत कमीत कमी १० लोक राहतात. त्यामुळे इथे लोकसंख्या किती असेल याचा अंदाज बांधता येईल. स्थलांतरीत लोक मोठ्या प्रमाणात असल्याने धारावीत लोकसंख्या किती याचा आकडा नाही. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी याठिकाणी दीड लाख वयस्क लोक असल्याचे समजते.

काही अंदाजानुसार, धारावीत किमान ३ ते १० लाख लोक राहत असल्याचे बोलले जाते. झोपडपट्टीत राहणाऱ्या या लोकांचे आयुष्य पाहण्यासाठी येथे परदेशी पर्यटक कायम येतात. २०१९ चा ट्रॅव्हल वेबसाइट ट्रिप एडवायजरचा ट्रॅव्हलर्स चॉईस पुरस्कार धारावीला मिळाला. ट्रिप एडवायजरने दावा केलाय की, परदेशी पर्यटक ताजमहलपेक्षा धारावी बघण्यासाठी जास्त उस्तुक असतात.

हे आहे स्लम टुरिझ्म, धारावीत ८० टक्के लोक यातूनच कमाई करतात. धारावीतील स्लम टुरिझ्म वर्षाला ६६५ मिलियन डॉलरच्या आसपास आहे. पर्यटक याठिकाणी अनेक तास घालवतात. गरिब लोक कसे राहतात, त्यांच्या झोपड्या कशा असतात. त्याचे डेली रुटीन कसे असते, इतकेच काय टॉयलेटचा वापर कसा होतो हे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक धारावीत मुक्कामही करतात.

परदेशी पर्यटक व्हिडिओ बनवत असतात. इथून सामान खरेदी करतात. धारावीत मातीची भांडी, हस्तशिल् यासारखे अनेक उत्पादन तयार होतात. धारावीची निशाणी म्हणून परदेशी पर्यटक मोठ्या उत्साहाने चढ्या दरात या वस्तू विकत घेतात. काही तासांसाठी गरीबी जगण्यासाठी पैसेही खर्च करतात. एकट्या धारावीत नव्हे तर जगातील अन्य देशातील स्लम टुरिझ्म चालते.

युगांडा, केनिया, केपटाऊन यात आघाडीवर आहे. २००६ मध्ये एका टूर ऑपरेटर कंपनीने खऱ्या आयुष्यातील जगणे पाहण्यासाठी या नावावर स्लम टुरिझ्म सुरू केले. इंग्रज काळात अधिकारी विशेषत: त्यांच्या पत्नी गरीबीतील लोकांचे आयुष्य पाहण्यासाठी झोपडपट्टीत येत होते. यावर अनेकदा वादही झालेत. मानवाधिकार संस्थेने यावर आक्षेप घेतला.

श्रीमंत लोक येतात, गरिबांची अवस्था पाहतात. फोटो काढतात आणि निघून जातात. टूर ऑपरेटर यातून बक्कळ पैसा कमावतात. परंतु त्याचा फायदा झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना होत नाही. झोपडपट्टीतील लोकही श्रीमंत लोकांना पाहून झटपट पैसे कमवण्यासाठी नको ते धंदे करतात. त्यात नशा, चोरी यांचाही समावेश आहे. शोध जर्नल रिसर्च बायबलमध्ये केनियातील नैरोबी हा अभ्यास केला आहे.

टॅग्स :पर्यटनtourism