सुंदरतेचा साज...बुलेटवर निघाल्या सौंदर्यवती! गिरगावच्या शोभायात्रेत नारीशक्तीचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 05:21 PM2024-04-09T17:21:56+5:302024-04-09T18:20:47+5:30

गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी गिरगावात शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. यंदाही मोठ्या उत्साहात मुंबईकर सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक वेशात बाइक रॅलीत सहभागी झालेल्या तरुणींनी लक्ष वेधून घेतलं.

मुंबईतला गुढीपाडवा म्हटलं की पहिलं नाव येतं ते म्हणजे गिरगावची शोभायात्रा. लहान थोरांसह तरुणाईचा मोठा सहभाग या यात्रेत असतो.

शोभायात्रेत विविध रथांसह महिलांच्या बाइक रॅलीचंही आयोजन केलं जातं. यात पारंपरिक वेशात तरुणी, महिला सहभागी होत असतात.

मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन गिरगावच्या शोभायात्रेत पाहायला मिळतं.

बाईक रॅलीतून पारंपरिक संस्कृतीसोबत नारीशक्तीचा संदेश दिला जातो.

मुंबई परिसरातील अनेक हौशी तरुणी, महिला आणि अगदी चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येनं शोभायात्रेला उपस्थित असतात.

जल्लोषाच्या वातावरणात मराठी नववर्षाचं स्वागत यानिमित्ताने केलं जातं.

नटूनथटून आलेल्या सौंदर्यवती यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या.

वेशभूषेसोबतच बाइकलाही छान सजवलं जातं.

टॅग्स :मुंबईMumbai